Bhojpuri Actresses Who Left Industry: चित्रपटसृष्टीचा झगमगाट जितका आकर्षक असतो, तितकीच त्यामागील काळी बाजू थक्क करणारी असते. भोजपुरी चित्रपटसृष्टीत एकेकाळी आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या अनेक अभिनेत्री आज अचानक मोठ्या पडद्यावरून गायब झाल्या आहेत. रिंकू घोष, सोनाली जोशी, सुप्रेना सिंह आणि पूनम सागर यांसारख्या टॉप अभिनेत्रींनी लग्नानंतर थेट इंडस्ट्री सोडण्याचा निर्णय घेतला आणि त्या वैवाहिक आयुष्यात रमल्या. तर दुसरीकडे, कामाचा अभाव आणि प्रचंड नैराश्यामुळे भोजपुरी अभिनेत्री मिताली शर्मा हिची आर्थिक परिस्थिती इतकी बिकट झाली की, तिच्यावर थेट मुंबईच्या रस्त्यांवर भीक मागण्याची वेळ आली.
मिताली शर्मा
भोजपुरी अभिनेत्री मिताली शर्माची सध्या खूप चर्चा होत आहे. नैराश्य आणि काम न मिळाल्यामुळे तिची आर्थिक परिस्थिती अत्यंत खालावली होती. परिस्थिती इतकी बिकट झाली की आज तिच्यावर मुंबईच्या रस्त्यांवर भीक मागण्याची वेळ आली. नुकतीच पोलिसांनी तिची सुटका करून तिला रुग्णालयात दाखल केलं आहे.

सोनाली जोशी
पवन सिंहबरोबर ‘प्रतिज्ञा’ या चित्रपटातून लोकप्रियता मिळालेली अभिनेत्री सोनाली जोशी आता ग्लॅमरच्या दुनियेपासून खूप दूर आहे. तिने भोजपुरीबरोबरच दाक्षिणात्य चित्रपटांमध्येही काम केलं आहे. एकेकाळी ‘रंगली चुनरिया तोहरे नाम की’ आणि ‘प्रतिज्ञा’ या चित्रपटांमुळे ती प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री होती, पण लग्नानंतर तिने इंडस्ट्री सोडली. आता ती कुटुंबाबरोबर वेळ घालवतेय.
रिंकू घोष
रिंकू घोष एकेकाळी भोजपुरी चित्रपटसृष्टीतील टॉपच्या अभिनेत्रींपैकी एक होती. प्रेक्षकांना ती खूप आवडायची. तिने निरहुआ, मनोज तिवारी आणि रवी किशन यांच्यासारख्या बड्या स्टार्सबरोबर काम केलं, पण लग्नानंतर ती इंडस्ट्रीपासून दुरावली.

सुप्रेना सिंह
भोजपुरी अभिनेत्री सुप्रेना सिंह तिच्या पहिल्याच चित्रपटातून प्रचंड लोकप्रिय झाली होती, ज्यामध्ये तिने रवी किशन यांच्या प्रेयसीची भूमिका साकारली होती. तिने ‘लहरिया लूटा ए राजा जी’ या भोजपुरी चित्रपटात काम केलं होतं. आपल्या लूक, डान्स आणि अभिनयाने तिने प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडली होती. परंतु, आता ती गेल्या अनेक वर्षांपासून मोठ्या पडद्यावरून गायब असून तिचे वैवाहिक आयुष्य एन्जॉय करत आहे.

पूनम सागर
निरहुआची पहिली हिरोईन पूनम सागर गेल्या अनेक वर्षांपासून चित्रपटसृष्टीपासून दूर आहे. निरहुआबरोबर तिने बरेच चित्रपट व गाणी केली. नंतर काही काळाने पूनम इंडस्ट्रीपासून दुरावली.
सीमा सिंह
भोजपुरी चित्रपटसृष्टीची ‘आयटम क्वीन’ म्हणून ओळखली जाणारी सीमा सिंह ही लग्नानंतर चित्रपटांपासून दूर गेली. ती आता चित्रपटांमध्ये आयटम डान्स करत नाही, तर चित्रपटांची निर्मिती करते. तसेच ती राजकारणातही बरीच सक्रिय आहे. एक काळ असा होता, जेव्हा तिच्या डान्सने प्रेक्षक घायाळ व्हायचे.
