भोजपुरी अभिनेत्रीचा प्रियांका चोप्राच्या गाण्यावर बोल्ड डान्स, व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले…

हा व्हिडीओ पाहून असंख्य चाहते कमेंट करत तिचे कौतुक करताना दिसत आहेत.

भोजपुरी सिनेसृष्टीतील बोल्ड आणि ब्यूटीफूल अभिनेत्री मोनालिसा नेहमीच काही ना काही कारणामुळे चर्चेत असते. मोनालिसा सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. सोशल मीडियावर विविध ग्लॅमरस फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते. नुकतंच मोनालिसाने डान्स करतानाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात मोनालिसा बॉलिवूडची ‘देसी गर्ल’ अभिनेत्री प्रियांका चोप्राच्या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. सध्या तिचा हा व्हिडीओ चांगलाच चर्चेत आहे.

मोनालिसाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन हा व्हिडीओ शेअर केला आहे. सध्या तिचा हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. यात मोनालिसा ही प्रियांकाच्या ‘तिनका तिनका’ या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. हा डान्स करताना मोनालिसाने सुंदर साडी नेसली आहे. यामुळे तिच्या लूकला चार चांद लागले आहेत. मोनालिसाच्या डान्स करतानाच्या अदा पाहून नेटकरी घायाळ झाले आहेत. तिचा हा व्हिडीओ प्रेक्षकांच्या पसंतीस उतरताना दिसत आहे. तिच्या या व्हिडीओवर अनेक लाईक्स आणि कमेंट्स पाहायला मिळत आहे.

मोनालिसाचा हा व्हिडीओ पाहून तिचे असंख्य चाहते कमेंट करत कौतुक करताना दिसत आहेत. मोनालिसाच्या या व्हिडीओवर एका सोशल मीडिया यूजरने ‘मोना ऑन फायर’ असे म्हटले आहे. तर दुसरीकडे मोनालिसाच्या डान्समधील अदा पाहून अनेकांची मने घायाळ झाली आहेत.

सिनेसृष्टीत प्रसिद्ध असलेल्या मोनालिसाचे मूळ नाव अंतरा बिस्वास आहे. मोनालिसा भोजपुरी चित्रपटातील नावाजलेली अभिनेत्री आहे. तिने १२५ पेक्षा जास्त भोजपुरी चित्रपटांमध्ये काम केले आहे. हिंदी, बंगाली, ओदिशा, तामिळ, कन्नड आणि तेलगु चित्रपटातही तिने काम केले आहे. २०१६ मध्ये बिग बॉसच्या १० व्या सिझनमध्ये मोनालिसा स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती. मोनालिसा एकता कपूरच्या ‘नजर’ या मालिकेत खलनायिकेच्या भूमिकेत झळकली होती.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Bhojpuri star monalisa grooves to priyanka chopra jonas starrer song tinka tinka video viral nrp

Next Story
प्रत्यक्षाहुनी उत्कट : सण-उत्सवांची ‘व्हर्च्युअल’ प्रतिमा!
ताज्या बातम्या