राजकुमार राव आणि वामिका गब्बी यांचा ‘भूल चूक माफ’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर वेगाने कमाई करीत असल्याचे दिसून येत आहे. चित्रपटाच्या कमाईचा आलेख सलग दुसऱ्या दिवशी वाढला आहे आणि आता असे मानले जात आहे की, रविवारी तो एका दिवसातील सर्वाधिक कमाई करून चमत्कार करील.
‘भूल चूक माफ’ हा चित्रपट लोकांना खूप आवडला आहे आणि दुसरीकडे या चित्रपटाबाबत लोकांकडून संमिश्र प्रतिक्रिया मिळत आहेत. राजकुमार रावचा ‘भूल चूक माफ’ हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होण्यापूर्वीच वादाला सामोरा गेला हे विशेषतः सांगावे लागेल. दरम्यान, अनेक अडचणींना तोंड दिल्यानंतर हा चित्रपट शुक्रवारी (२३ मे) थिएटरमध्ये प्रदर्शित झाला.
सॅकनिल्कने एका अहवालात चित्रपटाच्या कमाईचे आकडे जाहीर केले आहेत. करण शर्मा दिग्दर्शित या चित्रपटाने भारतीय बॉक्स ऑफिसवर पहिल्या दिवशी सात कोटी रुपयांचा व्यवसाय केला होता. दुसऱ्या दिवशी चित्रपटाच्या कमाईत वाढ झाली आणि त्याने नऊ कोटी रुपयांचा व्यवसाय केला. चित्रपटाची आतापर्यंतची एकूण कमाई सुमारे १६ कोटी रुपये आहे. संध्याकाळ व रात्रीच्या शोमध्ये चित्रपटाला सर्वोत्तम प्रतिसाद मिळत आहे आणि जयपूर, चेन्नई, बंगळुरू यांसारख्या शहरांनी निर्मात्यांना श्रीमंत करण्यात मोठी भूमिका बजावली आहे.
या अभिनेत्याच्या चित्रपटातील कामाने मन जिंकले. ‘भूल चूक माफ’ला IMDb वर ८.२ इतके रेटिंग मिळाले आहे. याचा अर्थ प्रेक्षकांना चित्रपट आवडला आहे आणि त्याला माउथ पब्लिसिटीचा फायदा मिळेल. स्टारकास्टबद्दल बोलायचे झाले, तर राजकुमार राव आणि ‘बेबी जॉन’फेम अभिनेत्री वामिका गब्बी यांनी मुख्य भूमिका साकारल्या आहेत. त्याशिवाय संजय मिश्रा, रघुबीर यादव, सीमा पाहवा व झाकीर हुसेन यांनी इतर महत्त्वाच्या भूमिका साकारून चित्रपटाची शोभा वाढवली आहे. चित्रपटातील संजय मिश्राच्या कामाचे खूप कौतुक होत आहे.
राजकुमार रावने रंजनची भूमिका इतकी सुरेख साकारली आहे की, तो अभिनय करत आहे, असे वाटतच नाही. बऱ्याच वेळा त्याचा अभिनय रिपीट मोडमध्ये असल्याचे दिसते; पण तो त्यातून लवकर बाहेर पडतो. भावनिक दृश्यांमध्येही तो हृदयाला स्पर्श करतो.