अभिनेता राज कुमार राव याला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. अभिनेत्याने अनेक सिनेमांमध्ये दमदार भूमिका बजावत चाहत्यांचं मनोरंजन केलं आहे. अखेर राजकुमार राव आणि वामिका गब्बी यांचा ‘भूल चूक माफ’ हा चित्रपट आज म्हणजेच २३ मे रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. चित्रपटाच्या ट्रेलरला प्रेक्षकांचा खूप सकारात्मक प्रतिसाद मिळाला. अनेक दिवसांपासून राजकुमार आणि वामिका चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहेत. चित्रपटाची कथा खूपच रंजक आहे. राजकुमार रावचा हा कॉमेडी चित्रपट पहिल्या दिवशी किती कोटींची कमाई करू शकतो ते आपण जाणून घेऊ?

‘भूल चूक माफ’ पहिल्या दिवशी किती कमाई करू शकतो?

‘भूल चूक माफ’ ओटीटी आणि थिएटर रिलीजच्या वादात अडकला होता. मुंबई उच्च न्यायालयाने मॅडॉक फिल्म्स आणि पीव्हीआर आयनॉक्स यांच्यामधील वाद मिटवला. त्यासह आता ‘भूल चूक माफ’ २३ मे २०२५ रोजी अधिकृतपणे थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. वादानंतर अनेक प्रोमोज रिलीज झाले असले तरी ‘भूल चूक माफ’ची लोकप्रियता खूपच कमी होती; सॅकॅनिल्कच्या अहवालानुसार, करण शर्मा दिग्दर्शित हा चित्रपट पहिल्याच दिवशी पाच कोटींचा आकडा गाठेल, अशी अपेक्षा आहे.

‘पीव्हीआर आयनॉक्स’ व ‘सिनेपोलिस’मध्ये चित्रपटाची ३० हजार तिकिटे प्री-बुक झाली आहेत. जर या स्पॉट बुकिंगमध्ये चांगला प्रतिसाद मिळाला, तर त्याची ओपनिंग चांगली होईल. बॉक्स ऑफिसवर त्याला ‘केसरी वीर’, २२ दिवस जुना ‘रेड २’ व टॉम क्रूझच्या ‘मिशन इम्पॉसिबल ८’शी स्पर्धा करावी लागेल.

या अभिनेत्याचे शेवटचे सलग तीन चित्रपट त्याच्या आतापर्यंतच्या टॉप ५ ओपनरमध्ये समाविष्ट आहेत. या यादीत स्थान मिळविण्यासाठी, ‘भूल चूक माफ’ला पहिल्या दिवशी किमान ५.४० कोटी कमवावे लागतील.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘भूल चूक माफ’ स्टार कास्ट

‘भूल चूक माफ’ या चित्रपटाचे लेखन व दिग्दर्शन करण शर्मा यांनी केले आहे. चित्रपटाच्या स्टारकास्टबद्दल बोलायचे झाले तर, राजकुमार राव आणि वामिका गब्बी यांच्याव्यतिरिक्त, सीमा पाहवा, संजय मिश्रा, झाकीर हुसेन, रघुबीर यादव व इश्तियाक खान यांनीही चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.