मराठी नव्या वर्षाचा पहिला दिवस, साडे तीन मुहूर्तांपैकी महत्त्वाचा मुहूर्त असलेल्या गुढीपाडव्यानिमित्त देशभरात जल्लोष पाहायला मिळत आहे. सर्वसामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत अनेकजण सोशल मीडियावर गुढीपाडव्याच्या शुभेच्छा एकमेकांना देत आहेत. अशातच गुढीपाडव्याला संक्रांतीच्या शुभेच्छा देणाऱ्या एका अभिनेत्रीला सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी चांगलंच ट्रोल केलं आहे. ही अभिनेत्री आहे भूमी पेडणेकर.

पारंपरिक वेशातला फोटो शेअर करत भूमीने ट्विटरवरून चाहत्यांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत. पण या शुभेच्छा देताना तिने कॅप्शनमध्ये ‘तिळगूळ घ्या, गोड गोड बोला’ असं लिहिलं आहे. त्यामुळे नेटकऱ्यांनी तिच्यावर जोरदार टीका केली आहे.

आणखी वाचा – आरोग्यदायी आहार : तिळगूळ पोळी

‘मकरसंक्रांत’ आणि ‘गुढीपाडवा’ यांच्यातील फरक समजत नाही का, असा प्रश्न नेटकऱ्यांनी तिला केला आहे. तर अनेकांनी कमेंट्समध्ये उपरोधिकपणे होळी, दसरा, दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

आणखी वाचा – लहान मुलांचे बोरन्हाण का केले जाते? जाणून घ्या यामागचे कारण

भूमीने या पोस्टमध्ये #MarathiMulgi हा हॅशटॅगसुद्धा वापरला आहे. त्यावरून एका युजरने टीका केली आहे.  गुढीपाडवा आणि संक्रांत यामधला फरक समजत नाही आणि मराठी मुलगी म्हणे, अशा शब्दांत भूमीला ट्रोल केलं आहे.