महानायक अमिताभ बच्चन यांच्या बॉडीगार्डचा पगार ऐकून व्हाल थक्क!, स्वत:चा देखील आहे ‘हा’ बिझनेस

स्वत:चा बिझनेस असूनही जितेंद्र शिंदे बिग बींचा बॉडीगार्ड म्हणून काम करतात.

amitabh-bachchan-bodygaurd-salrry
(File Photo)

बिग बी अमिताभ बच्चन यांचे देशासह जगभरात चाहते आहेत. जिथे कुठे बिग बी जातील तिथे चाहते त्यांची एक झलक पाहण्यासाठी गर्दी करतात. यामुळे बिग बींसोबत कायम बॉडीगार्ड पाहायला मिळतात. अमिताभ बच्चन यांच्या संरक्षणासाठी जितेंद्र शिंदे हे त्यांचे बॉडीगार्ड कायम त्यांच्या सोबत असतात. बिग बींच्या अनेक फोटोंमध्ये आपण आजवर जितेंद्र शिंदेंना पाहिलं असेल. जितेंद्र शिंदे एखाद्या सावलीप्रमाणे सतत त्यांच्यासोबत असतात.

बॉलिवूडच्या महानायकाचा बॉडीगार्ड असलेल्या जितेंद्र शिंदेंबद्दल काही गोष्टी जाणून तुम्ही नक्कीच थक्क व्हाल. जितेंद्र शिंदे हे अमिताभ बच्चन यांचे पर्सनल बॉडीगार्ड आहेत. भारतातच नव्हे तर बऱ्याचदा बिग बींच्या परदेश दौऱ्यातही जितेंद्र शिंदे अंगरक्षक म्हणून बिग बींसोबत जातात. सिनेमाचं शूटिंग असो किंवा ‘कौन बनेगा करोडपती’ शोचं शूटिंग बिग बींच्या संरक्षणाची संपूर्ण जबाबदारी जितेंद्र यांच्या खांद्यावर असते. जितेंद्र शिंदे यांची स्वतःची सुरक्षा एजन्सी असूनही ते बिग बींसाठी अंगरक्षक म्हणून काम करतात. टाइम्स नाऊच्या एका रिपोर्टनुसार, अमिताभ बच्चन जितेंद्र शिंदे यांना वर्षाला दीड कोटी रुपये एवढा पगार देतात. देशातील अनेक खासगी कंपन्यांच्या सीईओंच्या पगारापेक्षा ही जास्त पगार बिग बी यांच्या या बॉडीगार्डला मिळतो हे ऐकून कुणालाही धक्का बसेल.

आणखी वाचा: सर्जरीनंतर लगेचच अभिषेक बच्चन शूटिंगसाठी तयार, म्हणाला “मर्द को दर्द नही होता”

amitabh-bachchan-bodygaurd-shinde
(File Photo)

 

 

सुप्रसिद्ध अमेरिकन अभिनेता आणि निर्माता एलिजा वुडला देखील शिंदे यांनी भारत दौऱ्यादरम्यान सुरक्षा पुरवली होती. बिंग बींच्या सांगण्यावरूनच शिंदे यांनी एलिजा वुडला सुरक्षा दिल्याचं वृत्त होतं. तर जितेंद्र शिंदे गेल्या अनेक वर्षांपासून बिग बींना सुरक्षा पुरवत आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Big b amitabh bachchan bodyguard annual salary is more then more than many companies ceo kpw

Next Story
चित्रगीत : सॅक्रेड चॅण्टस ऑफ शक्ती
ताज्या बातम्या