खास फोटो शेअर करत बिग बींनी दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा

बिग बींच्या या फोटोवर कमेंट करत अनेक सेलिब्रिटींसह चाहत्यांनी देखील त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत

big-b-diwali
(Photo-amitabhbachchan)

देशभरात दिवाळी सणाचा उत्साह साजरा केला जातोय. सगळीकडे जल्लोषाचं आणि आनंदाचं वातावरण आहे. बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रिटींनी देखील सोशल मीडियावरून चाहत्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यातच कायम चाहत्यांच्या संपर्कात राहणारे बॉलिवूडचे महानायक बिग बींनी देखील चाहत्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

बिग बी अमिताभ बच्चन अभिनयाप्रमाणेच सोशल मीडियावरही चांगलेच सक्रिय आहेत. वेळोवेळी पोस्ट शेअर करत ते चाहत्यांशी संवाद साधत असतात. दिवाळीच्या निमित्ताने देखील बिग बींनी एक खास फोटो शेअर करत चाहत्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी जया बच्चन यांच्यासोबतचा एक जुना फोटो शेअर केला आहे. दिवाळी साजरा करतानाचा बिग बींनी शेअर केलेल्या फोटोत दोघही खूपच तरुण दिसत आहेत. हा फोटो शेअर करत “शुभ दीपावली” असं कॅप्शन त्यांनी दिलंय.

Video: वांगणीचं जंगलं ते रेड लाइट एरिया आणि बरंच काही; ‘राजा हरिश्चंद्र’ चित्रपटाचे पडद्यामागचे रंजक किस्से

बिग बींच्या या फोटोवर कमेंट करत अनेक सेलिब्रिटींसह चाहत्यांनी देखील त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. कोणताही सण-समारंभ असो बिग बी आवर्जुन चाहत्यांना शुभेच्छा देत असतात.

दरम्यान, ‘कौन बनेगा करोडपती १३’ या शोमध्ये देखील दिवाळी विशेष एपिसोड पाहायला मिळणार आहे. यावेळी अमिताभ बच्चन स्पर्धकांसोबत दिवाळीचा जल्लोष साजरा करतील.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Big b amitabh bachchan share old diwali photo with jaya bachchan whis fans kpw

Next Story
गॉसिप
ताज्या बातम्या