Big Boss 15: यंदा ‘बिग बॉस’च्या घरात ‘हे’ स्पर्धक घेणार एण्ट्री, काय आहे थीम? कधी आणि कुठे पाहाल? घ्या जाणून

२ ऑक्टोबरला रात्री साडे नऊ वाजता ‘बिग बॉस १५’चा प्रिमियर पार पडणार आहे.

big-boss-15-contestants-list
(Photo-Instagram@colorstv)

प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी लवकरच ‘बिग बॉस’चा १५वा सिझन येत आहे. मध्य प्रदेशातील पेंच नॅशनल पार्कमध्ये या शोचा लॉन्च सोहळा नुकताच पार पडला आहे. यावेळी ‘बिग बॉस’च्या जुन्या पर्वातील अभिनेत्री देवोलीना आणि आरती सिंहने हा खास सोहळा होस्ट करत. ‘बिग बॉस’च्या १५व्या सिझनमधील स्पर्धकांची नाव जाहीर केली आहेत.

‘बिग बॉस ओटीटी’ ची उपविजेती शमिता शेट्टी आणि निशांत भट ‘बिग बॉस 15’मध्ये सामील होणार असल्याचं अधिकृतरित्या जाहीर करण्यात आलंय. तसचं ‘बिग बॉस ओटीटी’ च्या शर्यतीतून बाहेर पडलेला स्पर्धक प्रतीक सहजपाल ‘बिग बॉस १५’ चं टिकीट मिळवणारा पहिला स्पर्धक ठरला होता. यासोबतच ‘बिग बॉस 13’ चा उपविजेता असीम रियाजचा भाऊ उमर रियाज आणि डोनाल बिश्तदेखील ‘बिग बॉस 15’ च्या घरात सहभागी होणार आहेत. तसचं टेलिव्हिजनवरील हॅण्डसम हंक करण कुंद्रा ‘बिग बॉस १५’मध्ये सामील होणाऱ असल्याचं वृत्त आहे.

“…आणि मी त्यांना जे आवडतं तेच दिलं “, बोल्ड लूकमुळे चर्चेत आलेल्या उर्फीचं ट्रोलिंगवर उत्तर

हे स्पर्धक घेणार ‘बिग बॉस १५’मध्ये सहभाग?

‘खींच मेरी फोटो’ आणि ‘नागिन गिन गिन’ सारखी सुपरहिट गाणी गायलेली गायिका अक्सा सिंह देखील ‘बिग बॉस 15’ मध्ये सहभाग घेणार आहे.तसचं पंजाबी गायिका आणि अभिनेत्री अफसाना खानचं नावं देखील ‘बिग बॉस १५’ साठी चर्चेत आहे.सिंबा नागपाल, डोनल बिष्ट, विशाल कोटियन तसचं सोशल मीडिया कंटेंट क्रिएटर आकाश सिंहचं नाव देखील ‘बिग बॉस १५’साठी कन्फर्म मानलं जातंय.

कधी आणि कुठे पाहाल ‘बिग बॉस १५’

२ ऑक्टोबरला रात्री साडे नऊ वाजता ‘बिग बॉस १५’चा प्रिमियर पार पडणार आहे. ४ ऑक्टोबर म्हणजेच सोमवारपासून रात्री १०.३० वाजता कलर्सवर ‘बिग बॉस १५’चा प्रसारित होणार आहे. तर प्रत्येत विकेण्डचा ‘शनिवार का वार’ आणि ‘संडे का वार’ हे खास एपिसोड रात्री नऊ वाजता टेलिकास्ट होतील. या खास भागात सलमान खान स्पर्धकांची शाळा घेताना दिसेल.

बॉलिवूड अभिनेत्री रेखा ‘ही’ महत्वाची भूमिका बजावणार

तर या पर्वाची खासियत म्हणजे बॉलिवूडच्या लोकप्रिय अभिनेत्री रेखा या शोमध्ये एक खास भूमिका बजावणार आहेत. ‘विश्वसुंतरी’ ही भूमिका त्या निभावताना दिसतील. मीडिया रिपोर्टनुसार यंदाची थीम जंगलावर आधारित असल्याने जंगलातील घरातच स्पर्धकांना राहवं लागेल. त्यामुळे स्पर्धकांपुढे अनेक नवी आव्हानं असतील

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Big boss 15 contestants list theme and times all u need to know kpw

फोटो गॅलरी