‘बिग बॉस’च्या १० व्या पर्वातून प्रकाशझोतात आलेली स्पर्धक नितिभा कौल या कार्यक्रमानंतरही बरीच चर्चेत आहे. अर्थात चर्चेत येण्यामागची कारणं वेगळी असली तरीही तिला मिळालेल्या प्रसिद्धीमुळे अनेकांनाच आश्चर्याचा धक्काही बसला आहे. या रिअॅलिटी शोमध्ये सहभागी झालेल्या नितिभाच्या चाहत्यांचा आकडाही दिवसेंदिवस वाढतच आहे. इतकंच नाही तर, येत्या काळात ती एका कार्यक्रमाचं सूत्रसंचालनही करणार असल्याचं म्हटलं जात आहे. पण, सध्या नितिभाचं नाव असं एकाएकी प्रकाशझोतात येण्यामागचं कारण म्हणजे, तिने सोशल मीडियावर पोस्ट केलेले काही फोटो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तिने पोस्ट केलेले हे फोटो चर्चेत आले आहेत, कारण त्यामध्ये किंग खानची मुलगी सुहानासुद्धा दिसत आहे. सुहाना आणि इतर मित्रांसोबतचे फोटो नितिभाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केले आहेत. आता सुहाना आणि नितिभाची ओळख कशी झाली आणि त्या दोघींच्या या फोटोमागचं नेमकं कारण काय, याचं उत्तर येत्या काळात मिळेलच. पण, सध्या तरी ती पार्टी मूडमध्येच आहे असं म्हणायला हरकत नाही. सुहानासुद्धा गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आल्याचं पाहायला मिळालं होतं. सध्या कलाविश्वामध्ये किंग खानच्या या लाडक्या लेकीचा वावर पाहता तीसुद्धा अभिनय क्षेत्राकडे वळली तर त्यात आश्चर्य वाटण्याचं काहीच कारण नाही.

वाचा : अबब! इतक्या संपत्तीच्या मालकीण आहेत रेखा

वाचा : रवीनाने अक्षय कुमारला ‘या’ अभिनेत्रींसोबत पकडलं होतं…

‘बिग बॉस’च्या १० व्या पर्वातील सर्वसामान्य स्पर्धक म्हणून सर्वांसमोर आलेल्या नितिभाचं याच कार्यक्रमातील मनवीर गुर्जरसोबत नाव जोडलं गेलं होतं. सोशल मीडियावरही ती बरीच चर्चेत असते. नेहमीच विविध फोटो आणि व्हिडिओ शेअर करणाऱ्या नितिभाच्या फॉलोअर्सचा आकडाही दिवसेंदिवस वाढत आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Big boss contestant nitibha kaul seen partying with shah rukh khan daughter suhana in delhi
First published on: 05-07-2017 at 17:36 IST