बिग बॉस मराठी ३: गायत्री दातार रिलेशनशिपमध्ये?

‘बिग बॉस मराठी ३’च्या घरात गायत्रीची अनेक स्पर्धकांसोबत गट्टी जमली आहे.

gaytri-datar-big-boss-marathi
(Photo-PR)

अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेला ‘बिग बॉस’ सिझन ३ अखेर प्रेक्षकांच्या भेटीला आला असून ‘तुला पाहते रे’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेल्या गायत्री दातारचाही यात समावेश आहे. गायत्री या घरात आता बऱ्यापैकी रुळली असून तिच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. ती म्हणजे गायत्री सध्या प्रेमात पडली आहे.

‘बिग बॉस मराठी ३’च्या घरात गायत्रीची अनेक स्पर्धकांसोबत गट्टी जमली आहे. त्यामुळे या शोमधील कोणत्या स्पर्धकाच्या प्रेमात गायत्री पडली आहे? असा प्रश्न अनेकांना पडला असेल.गायत्रीच्या या प्रियकराचे नाव ऐकाल तर तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल. खुद्द बिग बॉस हे तिचे प्रियकर आहेत. सोशल मिडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडीओच्या माध्यमातून याचा खुलासा झाला आहे. या व्हिडिओमध्ये ती आपल्या प्रियकराबरोबर प्रेमाच्या गोष्टी करताना दिसत आहे. बिग बॉससमोर ती चक्क लाजतेय, त्यांच्यावर रुसतेय. आपल्या मनातल्या गोष्टी शेअर करतेय. एवढचं काय तर ‘बिग बॉस’ला आय लव्ह यू देखील म्हणत गायत्रीने प्रेमाची कबुली दिलीय.

परिणीती चोप्राने शेअर केला बिकिनीतील बोल्ड फोटो; प्रियांका चोप्राने दिली ‘ही’ कमेंट

नागा चैतन्यबद्दल ही गोष्ट समजल्याने आमिर खानसमोरच नागार्जुन झाले भावूक; ‘हे’ आहे कारण

‘बिग बॉस मराठी ३’च्या या पर्वाला सुरुवात होवून आठवडा पूर्ण होण्याआधीच घरात अनेक डावपेच सुरु झाल्याचं पाहायला मिळतंय. घरामध्ये न कळत दोन गट पडले असून दोन्ही गटात एक शीतयुद्ध सुरु झाल्याचं दिसून येतंय. नुकताच उत्कर्ष शिंदे या तिसऱ्या पर्वाचा पहिला कॅप्टन झाला आहे. उत्कर्षच्या या कॅप्टनसीमध्ये आता काय काय घडतंय हे येत्या आठवड्यात पाहायला मिळेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Big boss marathi 3 gaytri datar in relationship know how is her boyfriend kpw

फोटो गॅलरी