“महिला…महिला आणि भांडायला नंबर पहिला”; सोनाली पाटीलने तृप्ती देसाई यांच्यावर साधला निशाणा

सोनाली पाटील आणि तृप्ती देसाई यांच्यातही घरातील कामांवरून वादाची ठिगणी पडल्याचं पाहायला मिळणार आहे.

big-boss-marathi-sonali-patil-trupti-desai
(Photo-Insstagram@colorsmarathiofficial)

‘बिग बॉस मराठी’चा तिसरा सिझन चांगलाच रंगात आला आहे. पहिल्याच आठवड्यात स्पर्धकांमध्ये विविध टास्कमध्ये टक्कर पाहायला मिळाली. अनेक स्पर्धकांना टक्कर देत उत्कर्ष शिंदे तिसऱ्या पर्वाचा पहिला कॅप्टन ठरला आहे. तर कॅप्टनसी मिळवल्यानंतर घरातील कामाच्या वाटपावरून मात्र स्पर्धकांमध्ये वाद निर्माण झाला आहे. एकीकडे मिनल आणि जयमध्ये जोरदार भांडण पाहायला मिळाल्यानंतर सोनाली पाटील आणि तृप्ती देसाई यांच्यातही घरातील कामांवरून वादाची ठिगणी पडल्याचं पाहायला मिळणार आहे.

येत्या भागात सोनाली आणि तृप्ती देसाई यांच्यातील वादाचं नेमक कारण समोर येईल. मात्र सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या प्रोमोमध्ये सोनालीने तृप्ती देसाई यांच्या कार्यावरून त्यांच्यावर निशाणा साधल्याचं दिसून येत आहे. घरातील कामांवरून तृप्ती देसाईंनी सोनालीवर आवाज चढवत दम भरला आहे. “मी ऐकते म्हणून काहीही बोलायचं नाही. मी बोलते त्याची नीट उत्तर द्यायची. पुरुष जर काम करू शकतात तर महिलांनी का करू नये” असं म्हणत तृप्ती देसाईंनी सोनालीला शांत राहण्याची ताकिद दिली.

बिग बॉस मराठी ३: गायत्री दातार रिलेशनशिपमध्ये?

तृप्ती देसाई यांनी सोनालीवर दम भरला असला तरी सोनाली देखील काही मागे हटलेली नाही. सोनालीने देखील त्यांना प्रतिउत्तर दिलंय. “महिलांनाच विरोध करायला या कायम पुढे… महिला…महिला…महिला आणि भांडायला नंबर पहिला” असं म्हणत सोनालीने तृप्ती देसाई यांच्यावर निशाणा साधला आहे.

परिणीती चोप्राने शेअर केला बिकिनीतील बोल्ड फोटो; प्रियांका चोप्राने दिली ‘ही’ कमेंट

आता तृप्ती देसाई आणि सोनाली यांच्यातील हा वाद शमतो की या वादाच्या ठिणगीमुळे घरातील वातावरण आणखी तापणार हे येत्या भागात कळणार आहे. ‘बिग बॉसच्या चावडीवर’ महेश मांजरेकर कुणाची शाळा घेणार हे देखील पाहणं औत्सुक्याचं असणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Big boss marathi 3 sonali patil slams trupti desai kpw

फोटो गॅलरी