‘बिग बॉस मराठी ३’च्या घरातमध्ये अभिनेता अक्षय वाघमारेचा परफॉर्मन्स पाहणं प्रेक्षकांना आवडत आहे. अक्षयने आतापर्यंतच्या सर्वच टास्कमध्ये चांगली टक्कर दिली आहे. एकीकडे अक्षय ‘बिग बॉस मराठी ३’मध्ये सहभागी झाला असला तरी लवकरच अक्षय वाघमारेचं एक नवं रोमॅण्टिक गाणं प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

‘हळवेसे’ असं या गाण्याचे नाव असून हे गाणं जीवन मराठे व निकिता पुरंदरे यांनी स्वरबद्ध केलं आहे. मुळशी इथं चित्रीकरण करण्यात आलेल्या या गाण्यात सानिया निकम ही नवोदित अभिनेत्री झळकणार आहे. हळवेसे गाण्यात काम करण्याच्या अनुभवाविषयी अक्षय सांगतो, की ‘या गाण्याची सर्व टीम उत्साही असल्याकारणाने हे गाणे करताना खूप मजा आली. हे माझे पहिलेच रोमॅण्टिक गाणे असल्याने या गाण्याबद्दल मला कमालीची उत्सुकता आहे.’

IPL Matches Boost BEST Revenue, 500 Buses Used, Bring Children to Wankhede Stadium, best buses in ipl, best bus ipl, best bus revenue ipl, indian premier league best bus,
आयपीएलमुळे बेस्टला ८० लाखांचे उत्पन्न
cryptocurrency fraud marathi news
क्रिप्टो करंन्सीच्या नावावर युवकाने गमावले २३ लाख रुपये
This video of an elderly cobbler and two stray dogs in Mumbai
“जगातील सर्व श्रीमंतापेक्षा श्रीमंत आहे हा व्यक्ती”! भटक्या कुत्र्यांना प्रेमाने थोपटणाऱ्या काकांचा हृदयस्पर्शी Video Viral
Thipse and Gokhale
हम्पीकडून सर्वाधिक अपेक्षा! ‘कॅन्डिडेट्स’ बुद्धिबळ स्पर्धेबाबत ठिपसे, गोखले यांचे मत


‘हळवेसे’ या गाण्यासाठी नायक म्हणून अक्षय वाघमारे यांचेच नाव डोक्यात होते. मात्र नायिका सानिया निकम हिचे ‘मन हे वेडे’ गीताचे इंस्टाग्रामवर रील पाहून तिची या गाण्यासाठी निवड करण्यात आल्याचेही निर्माते श्रीनिवास यांनी सांगितले.

अक्षय संत, देवश्री आठल्ये व जीवन मराठे यांनी लिहिलेल्या गीताला स्वप्नील सावंत व जीवन मराठे यांनी संगीतबद्ध केले आहे. साहिल सहा यांनी नृत्य दिग्दर्शन केले असून श्रीनिवास कुलकर्णी व मधुसूदन कुलकर्णी हे या गाण्याचे निर्माते आहेत.