‘बिग बॉस मराठी’च्या तिसऱ्या पर्वाला सुरुवात झाली असून टास्कमुळे स्पर्धाकांमध्ये टक्कर देखील सुरु झाल्याचं चित्र पाहायाला मिळतंय. किचनमध्ये जेवणावरून वाद सुरु झाले आहेत, तर टास्कमध्ये स्पर्धा पाहायला मिळतेय. या शोमधील अभिनेत्री मीरा जगन्नाथने देखील प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. नुकताच या शोचा नवा प्रोमो रिलीज झाला असून यात मोमो म्हणजेच अभिनेत्री मीरा जगन्नाथने सुरेखा कुडची यांच्यासोबत एका सेटवर भांडण झाल्याचा किस्सा शेअर केला. हा जुना किस्सा ऐकून सुरेखा देखील थक्क झाल्याचं पाहायला मिळालं.

या प्रोमोमध्ये डायनिंग टेबलवर काही स्पर्धक गप्पा मारत बसल्याचं दिसून येत आहे. यावेळी मीराने सुरेखा कुडची यांना त्यांच्यासोबत एका शोमध्ये एकत्र काम केल्याचं सांगितलं. काही वर्षांपूर्वी मीराने सुरेखा कुडची यांच्यासोबत ‘नकळत सारे घडले’या मालिकेत काम केल्याची आठवण करून दिली. हे ऐकून सुरेखादेखील थक्क झाल्या. यावेळी मीराने त्यांना या शोमध्ये तिने साकारलेल्या भूमिकेची आठवण करून दिली. मात्र हे सांगत असतानाच मीराने त्यावेळी सुरेखा कुडची यांनी मीरासोबत भांडण केलं होतं याची आठवण करून दिली. सुरेखा यांना या गोष्टीचा विसर पडला असल्याने हे ऐकून त्यादेखील हैराण झाल्या.

Solapur Murder wife, Solapur, Murder second wife,
सोलापूर : तीन घरांच्या दादल्यात आर्थिक कारणांवरून दुसऱ्या पत्नीचा खून, रक्ताने माखलेल्या चाकूसह पती पोलिसांत हजर
Loksatta vasturang Lessons from redevelopment buildings Layout of flats
पुनर्विकासाचे धडे : कौटुंबिक अवकाश जपू या!
alibag mother killed her two kids marathi news
माता नव्हे तू वैरीणी! विवाहबाह्य संबंधांत अडथळा ठरलेल्या २ चिमुकल्यांचा आईनेच घेतला जीव
Afgan Women
‘व्याभिचार केल्यास महिलांना खुलेआम दगडाने ठेचून मारले जाणार’ तालिबानची घोषणा

बिग बॉस मराठी ३: “पहिल्याचं माहित नाही दुसऱ्या लग्नाबद्दल काहीही कहाण्या सांगू नको”; काम्या पंजाबीने स्नेहा वाघला फटकारलं

त्यावेळी मालिकेच्या सेटवर मीरासोबत सुरेखा कुडची असं काही वागल्या होत्या की ज्यामुळे ‘बिग बॉस मराठी’च्या घरात सुरेखा कुडची यांना पाहताच मीराच्या मनात अनेक प्रश्न आल्याचं ती म्हणाली, “तिथे आपलं ही काही झालं होतं….तुम्ही इथे आलात तेव्हा मला वाटलं बापरे या इथेही अशा वागणार आहेत का? पण तुम्ही इथे वेगळ्याच वाटतं आहात. तुमच्याकडे पाहून पॉझिटिव्ह वाईब्स वाटताय. या त्याच आहेत का असा मला प्रश्न पडला? ” असं मीरा म्हणाली. यावर सुरेखा कुडची यांनी तेव्हा काय घडलं होतं हे मीराला विचारलं. यावर मीरा म्हणाली, “तुम्ही माझी बॅग फेकून दिली होती.” मीराचं हे उत्तर ऐकून सुरेखा कुडची देखील थक्क झाल्या.

यावेळी सुरेखा कुडची यांनी त्यांना ही घटना लक्षात नसून त्या एखादी गोष्ट किंवा वाद लगेच विसरून जातात असं स्पष्ट केलंय. दरम्यान ‘बिग बॉस मराठी ३’च्या येत्या भागात टास्क दरम्यान वातावरण तापलेलं पाहायला मिळणार आहे. त्यामुळे आता या टास्क दरम्यान कोणत्या स्पर्धकांमध्ये वादाची ठिकणी पडणार आणि कोण टास्कमध्ये बाजी मारणार हे लवकरच कळेल.