‘बिग बॉस’ मराठीच्या नव्या पर्वाची सध्या जोरदार चर्चा सुरु झाली आहे. टीव्ही जगतातील सर्वात वादग्रस्त शो प्रेक्षक तितक्याच आवडीने पाहतात. ‘बिग बॉस’च्या घरात कोणकोणते स्पर्धक सहभागी होणार याबाबत अनेक चर्चा रंगत आहेत. स्पर्धकांमधील मैत्री, प्रेम, राडे, विविध टास्क ‘बिग बॉस’च्या नव्या पर्वामध्ये पाहायला मिळतील. ‘ऑल इज वेल’ ही या नव्या पर्वाची थीम आहे. दिग्दर्शक-अभिनेते महेश मांजरेकरच हा शोचे सुत्रसंचालक असतील. ‘बिग बॉस’ मराठीच्या नव्या पर्वामध्ये कोणते कलाकार असले पाहिजे? याबबात महेश मांजरेकर यांनी भाष्य केलं आहे.

काय म्हणाले महेश मांजरेकर?

jitendra awad challenge to ajit pawar
“अजित पवारांच्या डोक्यातलं विष बाहेर आलं”, ‘द्रौपदी’वरच्या विधानावरुन जितेंद्र आव्हाडांची टीका
shrikant shinde
“राज ठाकरे महायुतीत आले, तर…”; मनसेच्या युतीतील प्रवेशाच्या चर्चांवर श्रीकांत शिंदेंची प्रतिक्रिया
Does Achar Really Go Bad If Women In Periods Touch
मासिक पाळीत लोणच्याला हात लावला तर खरंच खराब होतं का? जया किशोरीचं स्पष्ट उत्तर, पाहा दोन्ही बाजू
It is necessary to change the mentality with effort to make the work perfect
जिंकावे नि जगावेही : मी ‘परिपूर्ण’…?

हिंदी ‘बिग बॉस’ प्रमाणे मराठी ‘बिग बॉस’ही चर्चेचा विषय ठरतं. मराठी ‘बिग बॉस’चं मागचं पर्व तर प्रचंड गाजलं. आता २ ऑक्टोबरपासून मराठी ‘बिग बॉस’चं नवं पर्व सुरु होत आहे. पण त्यापूर्वी मराठी चित्रपटसृष्टीमधील कोणत्या कलाकारांनी या घरामध्ये सहभागी झालं पाहिजे? याबाबत महेश मांजरेकर यांनी सांगितलं आहे.

‘राजश्री मराठी’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये महेश मांजरेकर म्हणाले, “सर्वप्रथम तर ‘बिग बॉस’च्या घरामध्ये सगळ्यात जास्त धमाल करेल तो म्हणजे सिद्धार्थ जाधव. सिद्धार्थनंतर दुसरा व्यक्ती या घरामध्ये धमाल करेल तो म्हणजे प्रवीण तरडे. हे दोघं जर ‘बिग बॉस’मध्ये असतील तर पूर्ण घर डोक्यावर घेतील. त्याचबरोबरीने जितेंद्र जोशीदेखील घरामध्ये धमाल करेल. त्याच्या कवितांनी तो घरामध्ये मैफिल रंगवेल. पण सिद्धार्थ-प्रवीण हा शो वेगळ्याच उंचीवर घेऊन जातील.”

आणखी वाचा – कित्येक वर्ष काम नाही, आर्थिक परिस्थिती बिकट अन्…; संजय कपूर यांच्या पत्नीचा खासगी आयुष्याबाबत खुलासा

पुढे ते म्हणाले, “सई ताम्हणकरलाही मला ‘बिग बॉस’च्या घरामध्ये बघायला आवडेल. कारण तिला कोणत्याच गोष्टी लपवता येत नाही. तिच्या चेहऱ्यावर पटकन दिसून येतं. सईची हिच गोष्ट मला आवडते.” महेश मांजरेकर यांनी ‘बिग बॉस’च्या घरामध्ये कोण असावं? याबाबत आपलं मत मांडलं. पण आता नक्की कोणते स्पर्धक या शोमध्ये सहभागी होणार याबाबत २ ऑक्टोबरला कळेलच.