बिग बॉस मराठी ३’ला सुरुवात, ‘या’ स्पर्धकांमध्ये रंगणार खेळ

एका क्लिकवर सर्व स्पर्धकांबद्दल घ्या जाणून

bigg-boss

“बिग बॉस सांगू इच्छितात, बिग बॉस आदेश देत आहेत” हे वाक्य आणि हा दमदार आवाज आता महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचणार आहे. सर्वांचा आवडता आणि तितकाच वादग्रस्त रिअॅलिटी शो बिग बॉस मराठी सिझन प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. जवळपास दोन वर्षांनंतर बिग बॉस मराठी प्रेक्षकांच्या भेटील आल्यामुळे चाहत्यांमध्ये उत्सुकता पाहायला मिळते. ‘बिग बॉस मराठी ३’मध्ये मराठी कलाकारांसोबतच किर्तनकार  शिवलीला बाळासाहेब पाटीलची तसचं सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई आणि कोळी गीतांसाठी ओळखले जाणीरे गायक दादूस म्हणजेच संतोष चौधरीने सहभाग घेतला आहे.

Live Blog

22:22 (IST)19 Sep 2021
आगरी कोळी संगीताचा बादशाह ‘दादूस’ बिग बॉस मराठी ३मध्ये

मराठीचा बप्पी लहिरी अर्थात आगरी कोळी संगीताचा बादशाह ‘दादूस’ म्हणून ओळखला जाणारा गायक संतोष चौधरीची बिग बॉस मराठी सिझन ३मध्ये एण्ट्री झाली आहे. “आई तुझा लालुल्या” गाण्याने संतोष चौधरीला खरी ओळख मिळाली. त्याची गाणी अतिशय हिट आहेत.

22:12 (IST)19 Sep 2021
‘डॅडीं’चा जावई बिग बॉसच्या घरात

‘डॅडी’ अर्थात गँगस्टर अरूण गवळी यांचा जावई अभिनेता अक्षय वाघमारे आता बिग बॉसच्या घरात दिसणार आहे. अक्षयने ८ मे रोजी डॅडींची मुलगी योगिता गवळीशी लग्न केले. ७ मे रोजी तो बाबा झाला तेव्हा चर्चेत होता. आता अक्षय बिग बॉसच्या घरात दिसणार असल्यामुळे चाहत्यांना आनंद झाला आहे 

22:08 (IST)19 Sep 2021
मीनल शाह ‘बिग बॉस मराठी’च्या घरात

रोडिज या लोकप्रिय ठरलेल्या रिअॅलिटी शोनंतर आता मीनल शाह  ‘बिग बॉस मराठी ३’मध्ये सामील झालीय. मीनल डिजिटल क्रिएटर आणि डान्सर आहे.  

21:51 (IST)19 Sep 2021
‘स्प्लिट्सविला’ फेम जय दुधाणे बिग बॉस मराठीच्या घरात!

MTV वरील अतिशय लोकप्रिय शो ‘स्प्लिट्सविला’च्या माध्यमातून लाखो तरुणींच्या मनावर राज्य करणारा जय दुधाणे आता बिग बॉसच्या घरात दिसणार आहे. स्प्लिट्सविलानंतर आता बिग बॉस मराठी सिझन ३मध्ये जयचा गेम पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.

21:33 (IST)19 Sep 2021
‘बिग बॉस मराठी ३’च्या घरात किर्तनकार शिवलीला बाळासाहेब पाटीलची एण्ट्री

किर्तनकार शिवलीला बाळासाहेब पाटील अवघ्या पाच वर्षांची असल्यापासून किर्तन करत आहे. आजवर १० हजारांहून अधिक किर्तनांचा टप्पा तिने पार केलाय. खास करून तरुण पिढीचं नेतृत्व करणारी शिवलीला तरुणांसाठी समाजप्रबोधनाचं काम करते. ‘बिग बॉस मराठी’च्या घरात आता शिवलीला तिच्या किर्तनाच्या जादूने स्पर्धकांमध्ये भक्तीमय वातावरण निर्माण करण्यासाठी सज्ज आहे. 

21:27 (IST)19 Sep 2021
‘तुला पाहते रे’ फेम गायत्री दातारची बिग बॉस मराठी ३मध्ये एण्ट्री!

‘तुला पाहते रे’ या मालिकेत इशा निमकरची भूमिका साकारात प्रेक्षकांची मने जिंकणारी अभिनेत्री गायत्री दातार आता बिग बॉसच्या घरात सहभागी झाली आहे. मालिकेत साध्या, सरळ इशाची भूमिका साकारणारी गायत्री खऱ्या आयुष्यात कशी आहे हे आता बिग बॉसच्या घरात पाहायला मिळणार आहे.

21:22 (IST)19 Sep 2021
अभिनेता विकास पाटील ‘बिग बॉस मराठी ३’ शोमध्ये

अनेक मालिकांमधून विविध भूमिकांमधून झळकलेला अभिनेता विकास पाटील ‘बिग बॉस मराठी ३’मध्ये सामील झालाय. नुकताच तो कलर्सवरील बायको अशी हवी मालिकेत झळकला होता. चार दिवस सासूचे, कुलवधू ,लेक माझी लाडकी , असंभव , अंतरपाट, माझीया माहेरा यासारख्या असंख्य मालिकांमधून झळकलेला अभिनेता विकास पाटील ‘बिग बॉस मराठी ३’च्या घरात सहभागी झालाय. अतरंगी , तुझ्या विन मरजावा , शेंटीमेंटल या सिनेमांमध्ये देखील त्याने विविध भूमिका साकारल्या आहेत.

21:08 (IST)19 Sep 2021
अभिनेत्री सुरेखा कुडची बिग बॉसच्या घरात

‘स्वाभिमान’ या मालिकेत काम करणाऱ्या अभिनेत्री सुरेखा कुडची ‘बिग बॉस मराठी ३’मध्ये सहभागी झाल्या आहेत. त्यांनी आजवर अनेक चित्रपट आणि मालिकांमध्ये भूमिका साकारली आहे. खलनायिकेच्या त्यांच्या भूमिका विशेष गाजल्या आहेत.

20:49 (IST)19 Sep 2021
आविष्कार दारव्हेकर ‘बिग बॉस मराठी ३’ मध्ये सहभागी

असंख्य मराठी मालिकांसोबत, नाटक आणि सिनेमांमध्ये आपली ओळख निर्माण केलेला अभिनेता आविष्कार दारव्हेकर ‘बिग बॉस मराठी’च्या तिसऱ्या पर्वात सहभागी झाला आहे. ‘किरण कुलकर्णी vs किलकर्णी’, ‘ती आणि इतर’, ‘सत्वपरिक्षा’ अशा सिनेमांमधून काम केलंय.

20:33 (IST)19 Sep 2021
भूमाता ब्रिगेडच्या संस्थापिका तृप्ती देसाई ‘बिग बॉस मराठी ३’च्या घरात 

‘बिग बॉस मराठी ३’मध्ये सामाजिक कार्यकर्त्या आणि भूमाता ब्रिगेडच्या संस्थापिका तृप्ती देसाई यांची एण्ट्री झाली आहे. कलाकारांव्यतिरिक्त या शोमध्ये कोण सामील होणार अशी प्रेक्षकांना उत्सुकता होती. यात आता तृप्ती देसाईंचं नाव सामील झालंय. शोच्या सुरुवातीलाच तृप्ती देसाईंनी सर्व स्पर्धकांना इशारा दिलाय. मोडेन पण वाकणार नाही असं त्या म्हणाल्या आहेत. तृप्ती देसाई अनेक कारणांमुळे कायम चर्चेत राहिल्या आहेत. त्यामुळे बिग बॉस मराठीच्या घरात आता त्यांची कोणती बाजू समोर येतेय हे पाहायला मिळेल. 

20:19 (IST)19 Sep 2021
‘मोमो’ची बिग बॉस मराठी ३च्या घरात एण्ट्री!

‘येऊ कशी तशी मी नांदायला’ या मालिकेतून घराघरात पोहोचणारी अभिनेत्री मिरा जगन्नाथ आता बिग बॉस मराठी सिझन ३च्या घरात स्पर्धक म्हणून सहभागी झाली आहे. 

20:11 (IST)19 Sep 2021
उत्कर्ष शिंदे ‘बिग बॉस मराठी ३’च्या घरात

आपल्या दमदार आवाजामुळे घराघरात पोहचलेल्या आदर्श शिंदेचा भाऊ उत्कर्ष शिंदेने ‘बिग बॉस मराठी ३’च्या घरात प्रवेश केलाय. उत्कर्ष उत्तम गायक आहेच. मात्र तो एक डॉक्टर देखील आहे. 

19:57 (IST)19 Sep 2021
अभिनेत्री स्नेहा वाघची बिग बॉसच्या घरात एण्ट्री!

मराठी आणि हिंदी मालिकांमध्ये काम करत अनेकांची मने जिंकणारी अभिनेत्री स्नेहा वाघ आता बिग बॉस मराठी सिझन ३मध्ये दिसणार आहे. बिग बॉसच्या घरात एण्ट्री करणारी स्नेहा ही तिसरी स्पर्धक आहे.

19:38 (IST)19 Sep 2021
दख्खनचा राजा ज्योतिबा फेम विशाल निकम ‘बिग बॉस मराठी ३’ मध्ये

‘बिग बॉस मराठी ३’ मध्ये सर्वांचा लाडका ज्योतिबा म्हणजे अभिनेता विशाल निकम देखील सहभागी झाला आहे. विशानने शानदार परफॉर्मन्स देत या शोमध्ये एण्ट्री केली आहे.  सांगलीचा विशाव हा ‘दख्खनचा राजा ज्योतिबा’ या मालिकेमुळे घराघरात पोहचला आहे. विशानने ‘मिथुन’ सिनेमातील एक खास किस्सा या वेळी शेअर केला आहे. विशाल नुकताच ‘स्टार प्रवाह’ वरील जय भवानी जय शिवाजी या मालिकेत शिवा काशिद यांच्या भूमिकेत झळकला होत. विशाल फिटनेस प्रेमी आहे.

19:28 (IST)19 Sep 2021
‘बिग बॉस मराठी ३’ ची पहिली स्पर्धक

‘बिग बॉस मराठी ३’ च्या घरात पहिला प्रवेश करणारण्याचा मान अभिनेत्री सोनाली पाटीलला मिळाला आहे. कोल्हापूरची सोनाली कोणतीही स्ट्रॅटजी न वापरता या खेळात सहभाग घेणार असल्याचं म्हणाली आहे. वैजू नंबर १ या मालिकेसह सोनालीने अनेक मालिकांमध्ये काम केलंय.

19:26 (IST)19 Sep 2021
प्रत्येक आठवड्याला असणार वेगळी थिम

‘बिग बॉस मराठी सिझन ३’मध्ये प्रत्येक आठवड्याला वेगळी थिम असणार आहे. या आठवड्यात ‘लेडीज स्पेशल’ थिम असणार आहे…

19:25 (IST)19 Sep 2021
असं असेल ‘बिग बॉस मराठी’ ३ चं घर

या शोचे होस्ट महेश मांजरेकर यांनी ‘बिग बॉस मराठी ३’ च्या खास घराची सफर घडवली आहेत. यावेळीच्या घरात फोनबुथसह आणखी काय वैशिष्ट्य आहेत हे महेश मांजरेकर यांनी सांगितलं. अर्थात या घरात प्रत्येक जागेची काही ना काही वैशिष्ट्य असणार आहेत. 

19:23 (IST)19 Sep 2021
सिद्धार्थ जाधवच्या धमाल कॉमेडीने शोला लागले चार चाँद

‘बिग बॉस मराठी’च्या बहुप्रितित्रीत सिझनसा सुरुवात झालीय. मोठ्या धमाकेदार अंदाजात ‘बिग बॉस मराठी’चं तिसंर पर्व प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. शोच्या पहिल्या प्रिमिअरला अभिनेता सिद्धार्थ जाधवने हजेरी लावत चार चाँद लावले आहेत. सिद्धार्थची अफलातून कॉमेडी प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. 

19:15 (IST)19 Sep 2021
‘बिग बॉसच्या चावडीवर या’, बिग बॉस मराठी ३चे शीर्षक गीत चर्चेत

नुकताच ‘बिग बॉस मराठी सिझन ३’ हा सर्वांचा लाडका शो सुरु झाला आहे. शोच्या सुरुवातीलाच बिग बॉसचे शीर्षक गीत सादर करण्यात आले. शोचे सूत्रसंचालक महेश मांजरेकर यांनी गणपती बाप्पाचे नाव घेत शोला सुरुवात केली आहे. 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Big boss marathi premiere know the contestants live blog kpw 89 avb