ब्रा फ्लॉन्ट केल्याने उर्फी जावेद झाली होती ट्रोल, म्हणाली “प्रसिद्धीच हवी होती तर कपडे न घालताच गेले असते”

उर्फीने परिधान केलेल्या क्रॉप शर्टमधून तिची ब्रा स्पष्ट दिसत असल्याने नेटकऱ्यांनी तिच्यावर निशाणा साधला होता.

ufri-javed-big-boss-ott
(Photo-Instagram@urfi.javedd)

‘बिग बॉस ओटीटी’मधील स्पर्धक उर्फी जावेद गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आली आहे. ‘बिग बस ओटीटी’मधून उर्फी बाहेर पडली असली तरी तिच्या बोल़्ड अंदाजामुळे ती चर्चेत आली. काही दिवसांपूर्वीच उर्फीला विमानतळावर स्पॉट करण्यात आलं होतं. यावेळी तिने परिधान केलेल्या कपड्यांमुळे नेटकऱ्यांनी तिला चांगलचं ट्रोल केलं.

उर्फीने परिधान केलेल्या क्रॉप शर्टमधून तिची ब्रा स्पष्ट दिसत असल्याने नेटकऱ्यांनी तिच्यावर निशाणा साधला होता. मात्र आता या ट्रोल करणाऱ्यांना उर्फीने उत्तर दिलंय. ईटीटाइम्सला दिलेल्या मुलाखतीत उर्फी म्हणाली, “माझ्या कपड्यांपेक्षा माझ्याबद्दल बोलण्यासारखं बरचं काही काही. लोक व्यक्ती म्हणून माझ्याबद्दल काही का बोलत नाहीत? मला माहितेय मी काहीही पोस्ट केलं तरी लोक माझ्याबद्दल बोलणारच. मी बिकीनी परिधान करो किंवा सलवार सूट लोक माझ्याबद्दल अशाच कमेंट करणार” असं उर्फी म्हणाली.

हे देखील वाचा: काय ‘मनी हाइस्ट’मध्ये विराट कोहली आणि बॉबी देओल?; नेटकऱ्यांकडून धमाल मीम्स व्हायरल

या मुलाखतीत पुढे उर्फी म्हणाली, ” मी लखनऊमध्ये एका जुन्या विचार असलेल्या कुटुंबात वाढले तरी मला कपड्यांवरून कधी कुणी काही म्हणालं नाही. आज मी मला हवे तसे कपडे परिधान करते. कोण काय म्हणतयं याची मला पर्वा नाही. ” प्रसिद्धीसाठी उर्फी एअरपोर्टवर तसे कपडे परिधान करून पोहचल्याचं अनेक नेटकऱी म्हणाले होते. यावर उर्फी म्हणाली, “प्रसिद्धीच हवी होती तर एअरपोर्टवर बिना कपड्यांमध्ये गेले असते. मी जशी आहे तशीच वागले आणि यामुळे जर मल प्रसिद्ध मिळत असेल तर चांगलच आहे.” असं ती म्हणाली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Bollywood Pap (@bollywoodpap)

हे देखील वाचा: “एकतर ब्रा दाखव किंवा जॅकेट तरी”; क्रॉप टॉपमुळे ‘बिग बॉस ओटीटी’ स्पर्धक उर्फी जावेद ट्रोल

एअरपोर्टवर उर्फीला काही दिवसांपूर्वी स्पॉट करण्यात आलं होतं. यावेळी उर्फीने डेनिम जीन्स आणि त्यावर एक क्रॉप डेनिम शर्ट परिधान केलं होतं. मात्र हे शर्ट इतकं तोकडं होतं की यातून उर्फीची ब्रा स्पष्ट दिसत होती. यावर एक नेटकरी म्हणाला होता, “मॉर्डन भिकारी” तर दुसरा नेटकरी म्हणाला, “अरे कुणाकडे जुने कपडे असतील तर या गरिबांना द्या.” तर आणखी एक नेटकरी म्हणाला, “एकतर ब्रा दाखव किंवा जॅकेट, काय पाहावं यात लोकांचा गोंधळ उडतोय”.

उर्फी जावेद ‘बिग बॉस ओटीटी’ या शोमधून एलिमिनेट होणारी पहिली स्पर्धक होती. एलिमिनेशननंतर या निर्णयावर उर्फीने नाराजी व्यक्त केली होती.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Big boss ott fame ufri javed get back who troll her showing bra at airport kpw