“निर्लज्ज बाई, लाज वाटत नाही का?”; पॅन्टचं बटन न लावल्याने अभिनेत्री उर्फी जावेद पुन्हा ट्रोल

गेल्या काही दिवसांपासून उर्फी जावेदला तिच्या बोल्ड कपड्यांवरून नेटकऱ्यांनी चांगलंच ट्रोल केलंय.

urfi-javed-bold-look
(Photo-Instagram@urf7i)

‘बिग बॉस ओटीटी’च्या घरातून बाहेर पडल्यापासूनच अभिनेत्री उर्फी जावेद चांगलीच चर्चेत आली आहे. उर्फीने तिच्या बोल्ड अंदाजासोबतच तिच्या हटके स्टाइलने अनेकदा नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं. बोल्ड कपड्यांमुळे उर्फीला अनेकदा ट्रोलदेखील केलं गेलं आहे. तर उर्फीने ट्रोल करणाऱ्यांना अनेकदा सडेतोड उत्तर दिलंय.

पुन्हा एकदा उर्फीने तिच्या कपड्यांमुळे अनेकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. उर्फीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून यात तिने परिधान केलेल्या कपड्यांमुळे तिला नेटकऱ्यांनी पुन्हा ट्रोल केलंय. नुकतच उर्फीला फोटोग्राफर्सनी स्पॉट केलं होतं. यावेळी तिने क्रॉप टॉप आणि चौकटींची पॅन्ट परिधान केलीय. मात्र उर्फीने पॅन्टचं बटन न लावल्याने तिने नेटकऱ्यांची टीका ओढावून घेतली. सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीने त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला असून हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. याl उर्फी कॅमेराला पोज देतेय. तर तिच्या पॅन्टचं बटन उघडं दिसतंय.

हे देखील वाचा: स्नेहा वाघला पूर्वाश्रमीच्या पतीसोबत राहवं लागणार ‘बिग बॉस मराठी ३’च्या घरात, घरगुती हिंसाचाराचे केले होते आरोप

 

View this post on Instagram

 

A post shared by Bollywood Pap (@bollywoodpap)

उर्फीच्या या लूकवर कमेंट करत एक नेटकरी म्हणाला, “पॅन्ट बंद करायला विसरली वाटतं.” तर दुसरा युजर म्हणाला, “बंद न लावण्याचीपण फॅशन आहे का आजकाल” आणखी एक युजर म्हणाला, “चांगल्या पॅन्टचं बटण उघड ठेवणं फॅशन आहे. निर्लज बाई, या लोकांना लाज वाटत नाही का?” अनेक नेटकऱ्यांनी कमेंट करत उर्फीच्या फॅशनवरून तिला ट्रोल केलं आहे. काही नेटकऱ्यांनी तिला एका टेलरची गरज असल्याचं म्हंटलं आहे.

urfi-troll
(Photo-Instagram@viralbhyani)

गेल्या काही दिवसांपासून उर्फी जावेदला तिच्या कपड्यांवरून नेटकऱ्यांनी चांगलंच ट्रोल केलंय.एअरपोर्टवर ब्रॉ फ्लॉन्ट केल्याने ती सर्वात आधी चर्चेत आली होती. त्यानंतर बोल्ड लूक आणि बॅकसेल टॉपमुळे देखील उर्फीने नेटकऱ्यांची टीका ओढावून घेतली होती.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Big boss ott fame urfi javed troll for wear unbuttoned pant video goes viral kpw