महामारीच्या काळात बॉलिवूडमधील बड्या सेलिब्रिटींची फी दुप्पट झाली, मग गरिबांच्या पगारात कपात का? – रोनीत रॉय

रोनितने करोना माहामारीच्या काळात त्याला देखील आर्थिक संकटाचा सामना करावा लागल्याचा खुलासा केला होता.

ronit-roy-

अभिनेता रोनित रॉयने बॉलिवूडमधील भेदभावाच्या वागणुकीवर बोट दाखवत निशाणा साधला आहे. करोना माहामारीच्या काळात बॉलिवूडमधील अनेक बड्या स्टार्सचं आणि सेलिब्रिटींचं मानधन दुप्पट झालं आहे. तर याच क्षेत्रात काम करणाऱ्या अनेक गरिबांना मात्र वेतन कपातीचा सामना करावा लागत असल्याचा खुलासा रोनितने केलाय.

हिंदूस्तान टाइम्सला नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत रोनित रॉयने बॉलिवूडमधील काही बदललेल्या परिस्थितीचा खुलासा करत दु:ख व्यक्त केलंय. “मी ही माहिती पडताळली आहे की सर्व ए- लिस्टर्स स्टारचा पगार म्हणजेच फी ही दुप्पट झालीय. मात्र गरिबांचे पैसै कापले आहेत. आमच्या क्षेत्रात हे जे काही घडत आहे हे खूपच चुकीचं आहे.” असं रोनित रॉय म्हणाला. गरीब पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबातील व्यक्तीचा पगार कापणं हे खूपच लाजीरवाणं असल्याचं तो म्हणाला. “एका लाईटमनला त्याचं संपूर्ण घर चालवायचं असंत. त्याचा पगार कापून तुम्हाला काय मिळणार? पगार कापायचाच आहे तर बड्या स्टार्टचा कापा ना…फक्त गरीब लोकांसोबत तुम्ही असे का वागता? हे अजिबात योग्य नाही” असं म्हणत रोनितने संताप व्यक्त केलाय.

“अर्धी टकली झाली”; शिल्पा शेट्टीचा नवा हेअर कट चर्चेत


यापूर्वी रोनितने करोना माहामारीच्या काळात त्याला देखील आर्थिक संकटाचा सामना करावा लागल्याचा खुलासा केला होता. रोनितची स्वत:ची सेक्युरीटी एजन्सी असून अनेक बॉलिवूड स्टार्सना तो सुरक्षा आणि बॉडीगार्ड पुरवतो. मात्र करोनाच्या काळात अनेक सेलिब्रिटींनी बॉडीगार्डसची गरज नसल्याचं म्हणत त्यांना कामावरून कमी केलं होतं असंही रोनित म्हणाला होता. या काळात रोनितने १२५ कर्मचाऱ्यांना स्वत:च्या सेव्हिंगमधून पगार दिला होता.

तर इंडियन एक्सप्रेसशी बोलताना रोनितने हा दीड वर्षांता काळ खूप कठिण असून या काळात खूप काही शिकायला मिळाल्याचं तो म्हणाला.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Big stars doubled their fees during pandemic in bollywood and ronit roy reveals kpw

Next Story
नाट्यरंग : ‘चित्रगोष्टी’ : चित्रं अन् जगण्याचं अन्योन्य नातं!
ताज्या बातम्या