‘बिग बॉस’ फेम साहिल आनंदच्या घरी नव्या पाहुण्याचे आगम

सोशल मीडिया पोस्टद्वारे दिली माहिती…

sahil anand,

काही दिवसांपूर्वी ‘बिग बॉस १०’ मधील स्पर्धक अभिनेता साहिल आनंदने सोशल मीडिया पोस्टद्वारे बाबा होणार असल्याची माहिती दिली होती. आता त्याच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचे आगमन झाले आहे. साहिलची पत्नी रजनीता मोंगाने एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे. चाहत्यांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

साहिलने सोशल मीडिया अकाऊंटवर बाळाचा पहिला फोटो शेअर केला आहे. पहिल्या फोटो शेअर करत त्याने १४ एप्रिल रोजी मुलगा झाल्याचे सांगितले आहे. तसेच मुलाचे नाव त्याने सहराज असे ठेवले असल्याची देखील माहिती दिली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sahil Anand (@sahilanandofficial)

आणखी वाचा : ‘तुझ्याकडे कोट्यावधी रुपये आहेत तर…’, राखी सावंतने साधला कंगनावर निशाणा

‘नमस्कार, मी सहराज आनंद आहे. माझा जन्म १४ एप्रिल २०२१ला झाला. माझ्या जन्मानंतर माझ्या पालकांना प्रचंड आनंद झाला आहे. त्यांच्या आयुष्यातील मी एक सर्वाते मोठे गिफ्ट आहे. त्या दोघांचेही माझ्यावर प्रचंड प्रेम आहे’ या आशयाचे कॅप्शन साहिलने फोटो शेअर करत दिले आहे. साहिलच्या या पोस्टवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे. तसेच काही कलाकारांनी देखील कमेंट करत साहिलला शुभेच्छा दिल्या आहेत.

साहिल काही दिवसांपूर्वी छोट्या पडद्यावर प्रदर्शित झालेली ‘कसौटी जिंदगी की २’ या मालिकेत काम करताना दिसत होता. तसेच त्याने ‘बिग बॉस १०’ या रिअॅलिटी शोमध्ये सहभाग घेतला होता. त्याने ‘स्टूंडट ऑफ द इअर’ या चित्रपटात देखील भूमिका साकारली आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Bigg boss 10 fame sahil anand blessed with baby boy avb

Next Story
चित्रगीत : सॅक्रेड चॅण्टस ऑफ शक्ती
ताज्या बातम्या