Bigg Boss 13 : सिद्धार्थ शुक्लाच्या अटकेचा व्हिडीओ व्हायरल

या व्हिडीओने सोशल मीडियावर गोंधळ उडाला आहे.

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय पण तितकाच चर्चेतील शो म्हणजे बिग बॉस. सध्या हिंदी बिग बॉसचे १३वे पर्व अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. शो मधील स्पर्धकांची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहेत. या स्पर्धकांमधील सिद्धार्थ शुक्लाने सर्वांचे लक्ष वेधले आहे. घरातील इतर स्पर्धकांशी सतत होणाऱ्या भांडणांमुळे तो चर्चेत आहे. अशातच सिद्धार्थचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये पोलीस सिद्धार्थला पकडून व्हॅनमध्ये बसवताना दिसत आहेत. पण हा व्हिडीओ जुना आहे. टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार सिद्धार्थचा हा व्हिडीओ २२ जुलै २०१८मधील आहे. त्यावेळी सिद्धार्थवर वेगात कार चालवण्याचा आरोप करण्यात आला होता. सिद्धार्थने इतक्या वेगाने कार चालवली होती की त्याचा कारवरील ताबा सुटला होता आणि तो ३ गाड्यांना धडक देतो. या घटनेमध्ये सिद्धार्थला कोणतीही दुखापत झाली नव्हती. पण इतर तिघांना मात्र रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर सिद्धार्थ विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तेव्हाचा त्याचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ व्हायरल बॉलिवूडने त्यांच्या यूट्यूब चॅनेलवर शेअर केला आहे.

बिग बॉसच्या घरात सिद्धार्थ हा सर्वात तापट स्पर्धक आहे. त्याचा सतत चढणारा पारा पाहून शोचा सूत्रसंचालक सलमान खानने त्याला राग कमी करण्याचा फॉर्म्यूला सांगितला होता. सिद्धार्थने बिग बॉसच्या घरात सुरुवातीला आसिम रियाज आणि अरहान खानला धक्काबुक्की केली होती.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Bigg boss 13sidharth shukla old video of getting arrested by mumbai police is viral avb

Next Story
गॉसिप
ताज्या बातम्या