असं असणार बिग बॉस १४चं घर? फोटो व्हायरल

पाहा फोटो..

आता लवकरच बिग बॉस १४ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय आणि तितकाच वादग्रस्त शो म्हणजे बिग बॉस. लवकरच बॉलिवूडचा भाईजान सलमान खान सूत्रसंचालन करत असलेला बिग बॉस १४ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पण बिग बॉस १४मध्ये कोणते कलाकार सहभागी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तसेच बिग बॉसचे घर कसे असणार? करोना व्हायरसमुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे घरात काही बदल करण्यात आले आहेत का? असे प्रश्न अनेकांना पडले आहे.

नुकताच सोशल मीडियावर ‘बिग बॉस १४’च्या घरातील फोटो व्हायरल झाले आहेत. Mr Khabri_official या इन्स्टाग्राम पेजने हे फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये बिग बॉस १४च्या घराची झलक दिसत आहे.

या फोटोंमध्ये बिग बॉस १४च्या घरातील बेडरुम, लिविंग एरीया कसा असणार हे दिसत आहे. हे फोटो शेअर करत ‘बिग बॉस १४ च्या घरातील बेडरुम’ असे म्हटले आहे. पण हे फोटो बिग बॉस १४च्या घरतील आहेत की नाही हे अद्याप समोर आलेले नाही.

‘स्पॉटबॉय’ने दिलेल्या वृत्तानुसार बिग बॉस १४मध्ये नैना सिंह, जस्मिन भसीन, करण पटेल, निशांत मलकानी, एजाज खान, राहुल वैद्य, सारा गुरपाल, शगुन पांडे, प्रतीक सेजलपाल आणि जान कुमार सानू हे कलाकार सहभागी होणार आहेत. तसेच ‘बिग बॉस १४’ ३ ऑक्टोबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Bigg boss 14 house photos viral on internet avb

ताज्या बातम्या