छोट्या पडद्यावरील ‘बिग बॉस’ हा शो वादग्रस्त आणि तितकाच लोकप्रिय शो आहे. ‘बिग बॉस’चे यंदाचे हे १५ वे पर्व सुरु आहे. हा शो सुरु झाल्यापासून वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. गेल्या काही दिवसांपासून अभिजीत बिचुकले चर्चेत आहे. बिग बॉसच्या घरात आल्यापासून त्याने शमिताशी लग्न केले. त्यानंतर देवोलिना भट्टाचार्जीकडे मागितलेल्या किसमुळे तो चर्चेत आला होता. आता पुन्हा एकदा अभिजीतने शमिताविषयी एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.

यावेळी अभिजीत राखीला बोलतो की “पहिले या टास्कमध्ये मी आणि तू आमनेसामने असणार होतो, पण त्यांना माहित होतं की संचालक मलाच बनवायचं आहे.” शमितापण तिथेच उभी होती आणि अभिजीत काय बोलतो हे ऐकत होती. त्यानंतर शमिताने अभिजीतला प्रश्न विचारला की “तू हे सगळं बोलतोस हे तू लोकांचे मनोरंजन करण्यासाठी बोलतोस की सहज बोलतोस, कारण तू आता मूर्ख दिसत आहेस.”

शमिता तिचा मुद्दा अभिजीतला समजावत बोलते, “तू जे काही बोलतो ते आम्ही एका कानाने ऐकतो आणि दुसऱ्या कानाने सोडून देतो. मी २१ वर्षांपासून इथे आहे. आम्ही काय करत आहोत हे आम्हाला कळतं, त्यामुळे हा शो कसा खेळायचा हे फक्त तुला माहितीये असं नाही. हा माझा तिसरा ‘बिग बॉस’ आहे आणि राखीचा कितवा शो आहे हे माहीत नाही, त्यामुळे तू जे बोलतो त्यामुळे लोक तुझ्यावर हसत आहेत.”

आणखी वाचा : Big Boss Marathi 3 नंतर अभिनेता विशाल निकम अडकणार लग्न बंधनात?

यावरून शमिता आणि अभिजीतमध्ये वाद होतो. अभिजीत म्हणाला “लोकांचे मनोरंजन तर मी करत आहे. २१ वर्षांपासून इथे असून काय केलसं तू? शमिताला ‘जहर’ नंतर काम सुद्धा मिळालं नाही. इथे आल्यानंतर मी कोणाला या बद्दल काही बोललो नाही तर ही का बोलते. शिल्पा शेट्टीचं नाव घेतलं की लगेच तिला काय होतं. हा विचार माझ्या डोक्यात आला आहे.” यावर राखी म्हणते, “असं आहे तर हे चुकीचं आहे.” त्यानंतर अभिजीत राखीला बोलतो, “पुढच्या एक-दोन दिवसात जर ती शोमध्ये राहिली तर, आता ही गोष्ट मी सगळ्यांसमोर काढणार आहे.”

आणखी वाचा : ‘गहराइयां’च्या टीझर पेक्षा दीपिकाचा किस आणि बिकिनी चर्चेत!

शमिता जे बोलली त्यावर अभिजीत राखीला बोलतो, “जर ती मला असे सांगत असेल की मी लोकांचे मनोरंजन करत आहे, तर ती माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. कारण तुम्ही सगळे मला वेडा समजून हसत आहात. राज कपूर यांनी तर ‘मेरा नाम’ जोकरवर चित्रपट केला होता, तर मग मी आहे या घरातला जोकर.”