Bigg Boss 15: …म्हणून स्पर्धकाने चक्क उचलला चाकू

एपिसोडचा प्रोमो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

afsana khan, bigg boss 15,
एपिसोडचा प्रोमो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

‘बिग बॉस’ हा शो छोट्या पडद्यावरील वादग्रस्त आणि तितकाच लोकप्रिय शो आहे. ‘बिग बॉस’चे हे १५ वे पर्व सुरु आहे. या पर्वात पहिल्या दिवसापासूनच स्पर्धकांमध्ये वाद होताना दिसत आहे. आता आगामी एपिसोडमध्ये भयानक गोष्ट होणार आहे. शोमध्ये असलेली स्पर्धक पंजाबी गायिका अफसाना खानने स्वत:वर ताबा पुन्हा एकदा गमावला आहे. शोमध्ये व्हीआयपी तिकीच न मिळाल्यानंतर अफसानाचे एक भयानक रुप पाहायला मिळाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अफसानाला शोमधून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. त्यामागे अनेक कारणं असल्याचं म्हटलं जात आहे.

‘बिग बॉस’च्या घरात सध्या उमर रियाज हा कॅप्टन आहे. उमरला करण कुंद्रा, निशांत भट्ट, तेजस्वी प्रकाश आणि अफसाना खानपैकी तिघांना निवडायचे होते. त्यावेळी उमरने अफसानाचे नाव घेतले नाही आणि बाकी तीन स्पर्धकांचे नाव घेतले. उमरचा हा निर्णय ऐकल्यानंतर अफसानाला खूप राग आला आणि तिने स्वत: वरचा ताबा गमावला.

आणखी वाचा : ‘टिप टिप बरसा पाणी’ गाण्याच्या रिमेकमध्ये कतरिनाला पाहून रवीना म्हणाली…

अफसाना ही किचन एरियात शमिता शेट्टी, जय भानुशाली, करण आणि उमरसोबत बसली होती. त्यावेळी अफसाना म्हणाली, सगळ्यांनी तिलाच टार्गेट केलं होतं आणि त्या सगळ्यांना तिला काढून टाकायचे होते. तर हा शो आपल्या सगळ्यांमध्ये असलेलं नातं टिकवून ठेवण्यासाठी नाही आणि स्वत: ला मारत आरडाओरडा सुरु करते. सगळ्यांनी चुकीच्या व्यक्तीवर निशाना साधला आहे असं म्हणते आणि ती स्वत: त वरचा ताबा गमावते.

आणखी वाचा : “आपण हिंदू की मुस्लीम?” आर्यन, सुहानाच्या प्रश्नावर शाहरुखने दिले होते ‘हे’ उत्तर

अफसाना ही उमर, तेजस्वी आणि करण यांच्यासोबत चांगली मैत्री होती आणि त्यात त्यांनी तिला न निवडल्यामुळे तिच्या भावना दुखावल्या. यावर जय तिला समजवतो की तिला वाईट वाटणं सहाजीक आहे. काही वेळातच अफसाना चाकू उचलते आणि काही वस्तू फेकून स्वत:ला इजा करण्याचा प्रयत्न करते. उमर, जय आणि करण तिला थांबवण्यासाठी तिच्या दिशेने धावतात आणि तिला शांत करण्याचा प्रयत्न करताना दिसतात, परंतु ती ऐकत नाही.

आणखी वाचा : क्रांती रेडकर राहत असलेल आलिशान घर आतुन पाहिलत का?

दरम्यान, असे म्हटले जाते की, उमरने अफसानाला व्हीआयपी झोनमधून बाहेर काढल्यानंतर तिने स्वत:वरचा ताबा गमावला. त्यानंतर अफसानाचे शमितासोबत भांडण होते. त्यांच्या हानामारी होती. अफसानाने शमितासोबत मारामारि केल्यामुळे बिग बॉस सगळ्या स्पर्धकांना लिव्हिंग एरियामध्ये एकत्र येण्यास सांगतात आणि अफसानाला शोमधून बाहेरचा रस्ता दाखवतात.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Bigg boss 15 afsana khan picks up knife to hurt herself after not being given the vip ticket dcp

ताज्या बातम्या