scorecardresearch

‘शमिता शेट्टी आणि अनुषा दांडेकर यांच्यामध्ये…’, करण कुंद्राचे एक्स गर्लफ्रेंडविषयी वक्तव्य

अनुषा दांडेकर आणि करण कुंद्रा यांचे काही दिवसांपूर्वीच ब्रेकअप झाले आहे.

‘शमिता शेट्टी आणि अनुषा दांडेकर यांच्यामध्ये…’, करण कुंद्राचे एक्स गर्लफ्रेंडविषयी वक्तव्य

सध्या छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय रिअॅलिटी शो ‘बिग बॉस १५’ चर्चेत आहे. मायशा आणि ईशाननंतर आता करण कुंद्रा आणि तेजस्वी प्रकाश यांच्या रिलेशनच्या चर्चा रंगल्या आहेत. करणने सर्वांसमोर प्रेमाची कबूली दिली आहे. दरम्यान त्याने त्याची एक्स गर्लफ्रेंड अनुषा दांडेकरची तुलना बिग बॉसमधील स्पर्धक अभिनेत्री शमिता शेट्टीशी केली आहे.

नुकत्याच पार पडलेल्या एपिसोडमध्ये करण कुंद्रा आणि तेजस्वी प्रकाश लव्ह लाइफ तसेच रिलेशनविषयी बोलताना दिसत होते. त्यावेळी तेथे घरातील इतरही काही स्पर्धक होते. दरम्यान, तेजस्वी करणच्या एक्स गर्लफ्रेंडविषयी बोलताना दिसते. त्यानंतर करण म्हणाली की प्रतीक सहजपालने एक यादी तयार केली आहे. या यादीमध्ये शमिता शेट्टी आणि अनुषा दांडेकर यांच्यामध्ये साम्य असणाऱ्या गोष्टी आहेत.
Video: ‘तो जबरदस्ती जवळ येऊन…’, तेजस्वी प्रकाश संतापली

शमिता आणि अनुषा यांच्यांमध्ये खूप साम्या आहे. दोघीही इमानदार, भावनिक, एक गोष्ट करायची ठरवली तर ती केल्या शिवाय सोडणार नाही अशा अनेक गोष्टी सारख्या आहेत असे करण म्हणाला. तसेच प्रतिकने त्या दोघींच्या केसांचा रंग देखील सारखा असल्याचे म्हटले. त्यानंतर तेजस्वी करणला म्हणते की जर तू शमिताच्या प्रेमात पडला तर. त्यावर उत्तर देत करण म्हणाला, नाही असे काही होणार नाही. शमिता राकेश बापटवर प्रेम करते. त्यामुळे असे काही शक्य नाही.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 27-10-2021 at 12:28 IST

संबंधित बातम्या