‘सलमान खानला तर मला शिव्या देण्याचे पैसे मिळतात…’ करण कुंद्राचं ‘ते’ वक्तव्य चर्चेत

अभिनेता सलमान खानबाबत करण कुंद्रानं बिग बॉसच्या घरात केलेलं वक्तव्य सोशल मीडियावर चर्चेत आहे.

karan kundrra, bigg boss 15, salman khan, karan kundrra stand up act, करण कुंद्रा, सलमान खान, बिग बॉस १५, भारती सिंह, हर्ष लिंबाचिया
सलमान खानबद्दल करण कुंद्रानं केलेल्या एका वक्तव्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होताना दिसत आहे.

‘बिग बॉस १५’च्या अंतिम सोहळ्याला आता काही तास उरले आहेत. येत्या रविवारी म्हणजेच ३० जानेवारीला या सीझनचा विजेता घोषित होणार आहे. अशात आता नुकताच प्रसारित झालेला नवा प्रोमो सोशल मीडियावर चर्चेत आहे. ज्यात सलमान खानबद्दल करण कुंद्रानं केलेल्या एका वक्तव्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होताना दिसत आहे. नुकत्याच प्रसारित झालेल्या या प्रोमोमध्ये भारती सिंह आणि हर्ष लिंबाचिया देखील दिसत आहे.

‘बिग बॉस १५’चा नवा प्रोमो कलर्स टीव्हीच्या अधिकृत सोशल मीडिया हॅन्डलवर शेअर करण्यात आला आहे. ज्यात घरातील सदस्यांना एक टास्क देण्यात आला असून या टास्क दरम्यान करण कुंद्रा, ‘सलमान खानला जर १००० कोटी मिळत असतील या शोसाठी तर त्यातील ९५० कोटी मला शिव्या देण्याचे असतात.’ असं म्हणताना दिसत आहे. अर्थात हा त्याच्या स्टॅन्ड अप कॉमेडी टास्कचा भाग होता. करणच्या अशा बोलण्यावर हर्ष लिंबाचिया म्हणतो, ‘बिग बॉसमधून बाहेर गेल्यानंतर गॅलॅक्सी अपार्टमेंटच्या बाहेर उभं राहून सलमानला सांग की सर मला काही तरी बोला.’ हर्षच्या या बोलण्यावर घरातील सर्वच सदस्य हसू लागतात.

‘बिग बॉस’च्या आगामी एपिसोडमध्ये घरातील सदस्यांचा आता पर्यंतचा प्रवास दाखवला जाणार आहे. आपला ‘बिग बॉस’मधील प्रवास पाहून प्रतीक सहजपाल आणि तेजस्वी प्रकाश खूपच भावुक झालेले या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहेत. दरम्यान मागच्या काही दिवसांमध्ये बिग बॉसच्या घरात बऱ्याच अनपेक्षित गोष्टी घडल्या. राखी सावंत, देवोलिना भट्टाचार्जी आणि अभिजित बिचुकले घरातून बाहेर पडले.

सध्या बिग बॉस १५ चा विजेता कोण होणार याबाबत सोशल मीडियावर उलट- सुलट चर्चा सुरू आहे. विजेतेपदाच्या शर्यतीत आता प्रतीक सहजपाल, शमिता शेट्टी, निशांत भट्ट, करण कुंद्रा, तेजस्वी प्रकाश आणि रश्मि देसाई हे सदस्य उरले आहेत. विशेष म्हणजे ३० जानेवारीला होणाऱ्या ग्रँड फिनालेला अभिनेत्री दीपिका पदुकोण हजेरी लावणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Bigg boss 15 karan kundrra said salman khan got fees to abuse me stand up act video viral on internetmrj

Next Story
‘धर्मवीर’: आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित चित्रपटाची प्रविण तरडेंकडून घोषणा, पाहा व्हिडीओ
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी