‘बिग बॉस’ हा शो छोट्या पडद्यावरील वादग्रस्त आणि तितकाच लोकप्रिय शो आहे. ‘बिग बॉस’चा सध्या १५ वे पर्व सुरु आहे. ‘बिग बॉस’ ओटीटीमध्ये लोकप्रियता मिळवलेली अभिनेत्री शमिता शेट्टी आता ‘बिग बॉस’मध्ये आली आहे. मात्र, गेल्या अनेक दिवसांपासून ती तिचं प्रेम राकेश बापटला मिस करत असल्याचे म्हणते. ते दोघे ही रिलेशनशिपमध्ये आहेत. प्रेक्षक त्यांच्या या फेवरेट जोडीला मिस करत होते. दरम्यान, राकेश आणि नाहा भसीन या दोघांनी ‘बिग बॉस’च्या घरात एण्ट्री केली आहे. शोमधला राकेशचा आणि शमिताचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्याची पूर्वाश्रमीची पत्नी रिद्धी डोगराने प्रतिक्रिया दिली आहे.

रिद्धीने तिच्या ट्विटर अकाऊंटवरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत रिद्धीने प्रतिक्रिया दिली आहे. या व्हिडीओत नेहा भसीन आणि शमिता एकमेकांना भेटून किती भावूक होतात ते सुरुवातीला पाहायला मिळतं. त्यानंतर चिम्पँझिच्या वेषात आलेला राकेश शमिताला पाठून येऊन पकडो पण तिला काही कळतं नाही. त्यानंतर राकेशला पाहून शमिता इमोश्नल होते. त्यांचा हा व्हायरल झालेला व्हिडीओ रिद्धीने शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत “चांगल्या प्रकारे खेळा आणि नीट खेळा…”,असे कॅप्शन रिद्धीने दिले आहे.

आणखी वाचा : “पैसे टाकले म्हणून तिने राज कुंद्राशी लग्न केलं!”; अनिल कपूरच्या विधानावर शिल्पा शेट्टीने दिलं उत्तर, म्हणाली…

आणखी वाचा : फोटो बच्चन कुटुंबाचा पण चर्चा मात्र भिंतीवरच्या पेंटिंगची, किंमत ऐकलीत का?

दरम्यान, राकेश आणि शमिता यांची जोडी ही प्रेक्षकांना प्रचंड आवडली आहे. एवढंच नाही तर त्यांनी त्यांच्या नात्याची कबुली देखील दिली होती. बिग बॉसमध्ये आल्यानंतर शमिता आणि राकेश एकमेकांपासून लांब झाले होते. राकेश आणि शमिताची भेट ही ‘बिग बॉस’ ओटीटीमध्ये झाली होती.