बिग बॉस १५ हा शो सध्या सोशल मीडियावर सातत्यानं चर्चेत आहे. नेहमीच वादग्रस्त शो म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बिग बॉस बाबत प्रेक्षकांमध्ये प्रचंड लोकप्रिता आहे. विशेष म्हणजे शोचा सूत्रसंचालक सलमान खानमुळेच हा शो एवढा लोकप्रिय झाल्याचं मानलं जातं. पण आता सलमान दोन भावांमध्ये भांडण लावण्याचा प्रयत्न करत असल्याचं बोललं जात आहे. विशेष म्हणजे याबाबत बिग बॉसची माजी स्पर्धक हिमांशी खुरानाचं ट्वीट चर्चेत आलं आहे.

नुकत्याच एका एपिसोडमध्ये सलमान खान करण कुंद्रासोबतच उमर रियाजवरही चिडला. सलमाननं उमर रियाजच्या वागण्यावर राग व्यक्त करतानाच त्याची तुलना त्याचा भाऊ आणि बिग बॉसचा माजी स्पर्धक असिम रियाजशी केली. उमरशी बोलताना सलमान म्हणाला, ‘तू सुशिक्षित आहेस. डॉक्टर आहेस. तुझं बिग बॉसच्या घरातील हे वागणं बरोबर नाही. तू तुझ्या भावासारखा वागू नको आणि जर तुला हे सर्व तुला असिमने शिकवलं असेल तर त्याचं अजिबात ऐकू नकोस. आता कुठे कसं वागायचं हे लहान भाऊ मोठ्या भावाला शिकवणार का?’ याशिवाय सलमाननं असिमची नक्कल करत खिल्लीही उडवली.
माणुसकीची गोष्ट! तोंडानं श्वास देत ‘त्यानं’ वाचवले माकडाचे प्राण, व्हिडीओ शेअर करत रवीना टंडन म्हणाली…

Virat-Gautham interaction video goes viral
KKR vs RCB : भाईचारा ऑन टॉप! विराट-गंभीर एकमेकांशी संवाद साधतानाचा नवीन VIDEO व्हायरल
hitler swastika banned in switzerland
स्वस्तिकचा हिटलरशी संबंध कसा आला? स्वित्झर्लंडला या चिन्हावर बंदी का आणायची आहे?
Brad Hogg Says Parag Is eggo
IPL 2024 : ‘त्याच्यामध्ये अजूनही अहंकार आहे…’, ऑस्ट्रेलियाच्या माजी खेळाडूचे रियान परागबद्दल मोठं वक्तव्य
economic confidence china japan company
जर्मन कंपन्या चीनमधून पुन्हा जपानमध्ये का जात आहेत?

सलमान खानच्या या वागण्यावर मात्र असिम रियाजचे चाहते नाराज आहेत. त्यामुळे सलमानला सोशल मीडियावर ट्रोल केलं जातंय. एवढंच नाही तर असिमची गर्लफ्रेंड आणि बिग बॉस १३ची स्पर्धक हिमांशी खुरानानं देखील असिमच्या समर्थनार्थ ट्वीट करत सलमानचं नाव न घेता तो दोन भावांमध्ये भांडण लावण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला आहे.

हिमांशीनं तिच्या ट्वीटमध्ये सलमानच्या अशाप्रकारे दोन भावांची तुलना करण्याबाबत राग व्यक्त केला आहे. तिने लिहिलं, ‘हे खूप चुकीचं आहे. एका व्यक्तीनं आपलं काम संपवलं आहे आणि बिग बॉस १३ आता संपलं आहे. त्यामुळे आता सगळीकडे त्याचं नाव घेणं थांबवा. या आधी असिम सर्वांसाठी ही-मॅन होता. आमचं त्याच्यावर प्रेम आहे. यावरून असं वाटतंय की दोन भावांमध्ये भांडण लावण्याचा प्रयत्न केला जात आहे.’

हिमांशीनं तिच्या ट्वीटमध्ये कुठेही सलमानच्या नावाचा उल्लेख केला नसला तरीही तिच्या बोलण्याचा रोख सलमानकडेच असल्याचं म्हटलं जात आहे. सध्या हिमांशीचं हे ट्वीट सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरताना दिसत आहे.