scorecardresearch

Bigg Boss 15 : ईशान सहगल आणि मायशा अय्यरच्या रिलेशनशिपवर सलमानने केला प्रश्न?

एकीकडे बिग बॉसच्या घरातील स्पर्धकांमध्ये भांडणे सुरु आहेत तर दुसरीकडे काही स्पर्धकांमध्ये जवळीक निर्माण होत असल्याचे दिसत आहे

Bigg Boss 15 : ईशान सहगल आणि मायशा अय्यरच्या रिलेशनशिपवर सलमानने केला प्रश्न?
एकीकडे बिग बॉसच्या घरातील स्पर्धकांमध्ये भांडणे सुरु आहेत तर दुसरीकडे काही स्पर्धकांमध्ये जवळीक निर्माण होत असल्याचे दिसत आहे.

छोट्या पडद्यावरील ‘बिग बॉस’ हा शो वादग्रस्त आणि तितकाच लोकप्रिय आहे. ‘बिग बॉस’चे १५ वे पर्व सुरु आहे. सध्या ‘बिग बॉस’च्या घराचे दोन भाग झाले आहेत. एक घरवाले आणि दुसरे जंगलवासी असे हे भाग आहेत. या दोघांमध्ये सतत काहीना काही वाद होत असतो. या शोचे सुत्रसंचालन बॉलिवूडचा भाईजान सलमान खान करत आहे. दुसऱ्या विकेंडमध्ये सलमानने स्पर्धकांची हजेरी घेतली आहे. सलमानने स्पर्धक मायशा अय्यर आणि ईशान सहगलने नॅशनल टीव्हीवर लिप लॉक केल्यामुळे त्यांना एक सल्ला देत त्यांच्या नात्यावर प्रश्न उपस्थित केला आहे.

सलमान खान या ‘विकेंड का वार’मध्ये जवळपास सगळ्याच स्पर्धकांवर संतापला होता. सलमान सगळ्यांना बोलला की “ते सगळे खूप आक्रमक होत आहेत, ज्याची गरज नाही. काही गरज नसतात शारीरिक शक्तीचा वापर केला जात आहे, ज्यामुळे नुकसान होऊ शकते.”

आणखी वाचा : घटस्फोटानंतर समांथाने केली मोठी घोषणा!

ईशान आणि मायशाला सलमानने एक मोलाचा सल्ला दिला आहे. “हे कसं दिसत आहे? असा प्रश्न सलमान त्या दोघांना विचारतो आणि ते दोघे टीव्हीवर कसे दिसत असतील यावर त्यांनी लक्ष दिले पाहिजे. सलमान पुढे म्हणाला, माझ्यामते हे टीव्हीवर चांगलं दिसत नाही. जर तुम्ही भविष्यात एकत्र राहिला नाहीत तर हे सगळं पाहून कसं वाटेल. त्यामुळे तुम्ही थोडं डोकं लावून खेळा.”

आणखी वाचा : सैफसोबत लग्न करण्यासाठी करीनाने आई-वडिलांना दिली होती ‘ही’ धमकी

पुढे मायशाने नियमांचे पालन न केल्याबद्दल सलमान तिच्यावर टीका करतो. सलमानने तिला बाथरूममध्ये धूम्रपान केल्याबद्दल फटकारले. तो पुढे म्हणाला की “ती तुमची इच्छा आहे तुम्हाला करायचं की नाही, पण ते अशा प्रकारे करा की कोणालाही कळणार नाही.”

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 17-10-2021 at 10:26 IST

संबंधित बातम्या