छोट्या पडद्यावरील वादग्रस्त कार्यक्रम म्हणून ‘बिग बॉस’ या कार्यक्रमाकडे पाहिलं जातं. सध्या बिग बॉस हिंदीचे १५ वे पर्व सुरु आहे. मात्र बिग बॉस हिंदीला प्रेक्षकांचा अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसत आहे. बिग बॉस सुरु झाल्यापासून याचा टीआरपी हा घसरत असल्याचे दिसत आहे. याची भीती बिग बॉसच्या निर्मात्यांसह बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या चेहऱ्यावरही स्पष्ट दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर सलमान खानने वीकेंडचा वॉर या भागात स्पर्धकांना चांगलंच सुनावले. बिग बॉसचा शो संपल्यानंतर अद्याप कोणत्याही स्पर्धकाची खरी ओळख अजून कॅमेऱ्यासमोर आलेली नाही, असे सलमान म्हणाला.

यावेळी सलमानने अभिनेता आणि बिग बॉस १३चा विजेता सिद्धार्थ शुक्लाची आठवण काढली. यंदाच्या बिग बॉसमध्ये सर्वजण खोटे वाटत आहे. या ठिकाणी मला कोणीही विजेता दिसत नाही. सर्वजण एकाच ठिकाणी आहेत. सिद्धार्थ शुक्ला हा वन मॅन आर्मी होता, असे सलमान यावेळी म्हणाला. तसेच बिग बॉस १३ मधील स्पर्धक असीम रियाझ आणि सिद्धार्थ शुक्ला यांच्यातील मैत्री-शत्रुत्व हे सर्व उघडपणे दिसत होते, असे सलमानने बिग बॉसच्या इतर स्पर्धकांना सांगितले.

हेही वाचा : “हा तुझा नवरा आहे की कोणाला…”, सलमान खानने घेतला राखी सावंतवर संशय

दरम्यान सलमानचा या वक्तव्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सलमान खानच्या या वक्तव्यानंतर अनेक जण सिद्धार्थ शुक्लाचे कौतुक करत आहेत. विशेष म्हणजे BB EMPEROR SIDHARTH हा ट्रेंड सध्या सोशल मीडियावर ट्रेंडीगमध्ये पाहायला मिळत आहे.

दरम्यान काही नेटकऱ्यांनी त्याच्या या वक्तव्यावरुन सलमानवर टीका केली आहे. बिग बॉसचा शो सुरू झाल्यानंतर २ महिन्यांनी सलमान खानने सिद्धार्थ शुक्लाचे नाव घेतले. तेही जेव्हा टीआरपी घसरला. ‘बरोबर, सुरुवातीला श्रद्धांजली दिली नाही. त्यावेळी तो आठवला नाही आणि आता टीआरपी घसरल्यानंतर तुम्हाला सिद्धार्थ शुक्ला आठवला, अशी कमेंट नेटकऱ्याने केली आहे.

हेही वाचा : VIDEO: ‘अंतिम’ प्रदर्शित होताच चाहत्यांनी सिनेमागृहामध्येच फोडले फटाके, सलमान खान म्हणतो…

नुकतंच बिग बॉस १५ च्या घरात तीन वाईल्ड कार्ड स्पर्धकांची एण्ट्री झाली. यामध्ये रश्मी देसाई, देवोलीना भट्टाचार्जी आणि ड्रामा क्वीन राखी सावंत या अभिनेत्रींचा समावेश आहे. यात बिग बॉसच्या घरात बॉलिवूडची ड्रामा क्विन राखी सावंत तिच्या पतीसह सहभागी झाली. यामुळे सध्या सर्वत्र राखी सावंत आणि तिच्या पतीविषयी चर्चा सुरु आहेत.