बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित शो ‘बिग बॉस १५’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस सज्ज होणार आहे. जसा शोचा ग्रँड प्रीमिअर जवळ येत आहे तशी शो बद्दलची उत्सुकता वाढत जात आहे. या शोमध्ये सहभागी होण्यासाठी स्पर्धकांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. मात्र शो सुरू होण्या पूर्वीचं एका स्पर्धकाने घरात जाण्यास नकार दिला आहे.

काहीदिवसांपूर्वी मध्य प्रदेशातील पेंच नॅशनल पार्कमध्ये या शोचा लॉन्च सोहळा पार पडला आहे. यावेळी ‘बिग बॉस’च्या जुन्या पर्वातील अभिनेत्री देवोलीना आणि आरती सिंह हा खास सोहळा होस्ट करताना दिसल्या. या वेळेस ‘बिग बॉस ओटीटी’ची उपविजेती शमिता शेट्टी, प्रतीक सेजपाल आणि अनेक नामवंत कलाकार या सिझनमध्ये सहभागी होतं असल्याचे माहिती त्यांनी दिली. या यादीत सुप्रसिद्ध गायिका अफसना खानचं नाव देखील सामील होते, मात्र तिने शेवटच्या क्षणी बिग बॉसच्या घरात जाण्यास नकार दिला आहे. अफसना हॉटेलमध्ये क्वारंटाईनअसताना तिला पाॅनीक अटॅक आले आणि अचानक तब्येत खराब झाल्यामुळे तिने शोमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे.

या आठवड्याच्या सुरूवातीला, ‘बिग बॉस 15’ च्या नवीन प्रोमोमध्ये तेजस्वी प्रकाश, करण कुंद्रा आणि सिम्बा नागपाल यांच्यासह अफसाना देखील घरात एन्ट्री घेणार असल्याचे सांगितले होते. अफसनाने शोमध्य सहभागी होतं नसल्याची माहिती तिने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन दिली आहे. तिने इन्स्टावर स्टोरी पोस्ट करत फॅन्सची माफी देखील मागितली आहे. अफसनाने शेअर केलेल्या फोटोत तिने औषध दाखवली आहेत आणि ‘सॉरी फॅन्स पण प्लीझ’, असे लिहिले पाहायला मिळाले आहे.

दरम्यान बिग बॉसच्या घरात ‘बिग बॉस ओटीटी’चा रनरअप निशांत भट्ट, ‘बिग बॉस 13’ चा उपविजेता असीम रियाजचा भाऊ उमर रियाज आणि डोनाल बिश्त देखील ‘बिग बॉस 15’ च्या घरात सहभागी होणार आहेत. तसंच ‘बिग बॉस ओटीटी’च्या पहिल्या सिझनची विजेती दिव्या अग्रवाल देखील बिग बॉस १५मध्ये जाणार असल्याच्या चर्चा रंगत होत्या. मात्र तिचा बॉयफ्रेंड वरुण सूदने ट्विट करत ती सहभागी होत नसल्याची माहिती दिली आहे.