‘बिग बॉस ८’च्या स्पर्धकांमध्ये उपेन पटेल, आर्य बब्बर, व्हिजे बानी इत्यादींच्या नावाची जोरदार चर्चा

सलमान खान सुत्रसंचालक असलेला छोट्या पडद्यावरील ‘बिग बॉस’ हा रिअॅलिटी शो जसा प्रसिध्द आहे, त्याचप्रमाणे या शोमध्ये सहभागी होणाऱ्या स्पर्धकांविषयी प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता असते.

सलमान खान सुत्रसंचालक असलेला छोट्या पडद्यावरील ‘बिग बॉस’ हा रिअॅलिटी शो जसा प्रसिध्द आहे, त्याचप्रमाणे या शोमध्ये सहभागी होणाऱ्या स्पर्धकांविषयी प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता असते. रविवारपासून कलर्स वाहिनीवर सुरू होणाऱ्या ‘बिग बॉस ८’ मधील सहभागी स्पर्धकांबाबत प्रेक्षक कमालीचे उत्सुक आहेत. ‘बिग बॉस ८’ मधील सहभागाबाबत खालील सेलिब्रिटींच्या नावांची जोरदार चर्चा आहे.

श्वेता साळवी – फटाकडी म्हणून हिची ओळख आहे

सुशांत सिंग – चित्रपट आणि छोट्या पडद्यावरील हा नावजलेला चेहरा. छोट्या पडद्यावर सध्या सुरू असलेल्या ‘सावधान इंडिया’ या मालिकेचा तो सुत्रसंचालक आहे. ‘हेट स्टोरी २’ या चित्रपटात त्याने प्रमुख भूमिका साकारली होती.

उपेन पटेल – मॉडेलिंगपासून सुरुवात केलेल्या उपेनने ‘३६ चायना टाऊन’ चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये प्रवेश केला. या चित्रपटासाठी उत्कृष्ट नवकलाकाराचा पुरस्कारदेखील त्याने मिळवला होता. परंतु, त्याचा हा करिश्मा एका चित्रपटापुरताच मर्यादित राहिला.

व्हिजे बानी – एमटीव्हीच्या ‘रोडीज् ४’ मधून पुढे आलेली आणि ‘आप का सुरूर’ चित्रपटात काम केलेली बानी इतर स्पर्धकांना चांगली टक्कर देऊ शकते.

सोनाली राऊत – सोनालीच्या रुपाने ‘बिग बॉस’च्या घरात ग्लॅमर येईल. सुपरमॉडेल उज्वला राऊतची ती धाकटी बहिण आहे.

रश्मी देसाई – छोट्या पडद्यावरील हा सर्व परिचित चेहरा आहे. टीव्हीवरील ‘उतरन’ मालिकेमुळे ती घराघरात पोहचली. याच मालिकेतील नंदिश संधूबरोबरच्या तिच्या लग्नाच्या आणि ब्रेकपच्या बातम्यांमुळे ती चर्चेत राहीली. याशिवाय तिने अनेक विनोदी आणि डान्सिंग रिअॅलिटी शोमधून भाग घेतला आहे.

करिश्मा तन्ना – करिश्माच्या नावावर ‘क्योकी सास भी कभी बहू थी’सारखी प्रसिध्द मालिका असून, ‘ग्रॅण्ड मस्ति’सारख्या प्रौढ विनोदी चित्रपटातदेखील ती दिसली होती.

मोहित मल्होत्रा – ‘स्प्लिट्स व्हिला’च्या दुसऱ्या पर्वात दिसलेल्या मोहितने नंतर ‘मितवा फुल कमल के’, ‘ससुराल गेंदा फुल’, ‘बडे अच्छे लगते है’, ‘क्या हुवा तेरा वादा’ अशा अनेक मालिकांमधून भूमिका साकारल्या आहेत.

आर्य बब्बर – जेष्ठ अभिनेते राज बब्बर यांचा हा मुलगा. ‘अब के बरस’ हा त्याच्या कारकिर्दीचा पहिला चित्रपट फ्लॉप ठरला होता. सलमानने आर्यचे नाव सुचविल्याचे बोलले जाते.

सुशांत दिग्विकर – सुशांत हा २०१४ च्या ‘मि. गे-२०१४’ किताबाचा विजेता आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Bigg boss 8 final list of contestants revealed

ताज्या बातम्या