बिग बॉस फेम आणि टेलिव्हिजन मालिकेतील प्रसिद्ध अभिनेत्री अर्शी खानच्या गाडीला अपघात झाला आहे. यात ती गंभीररित्या जखमी झाली आहे. तिला दिल्लीतील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ‘टाईम्स ऑफ इंडिया’ने याबाबतचे वृत्त दिले आहे.
‘टाईम्स ऑफ इंडिया’ने दिलेल्या माहितीनुसार, अपघातावेळी अर्शी ही त्या कारमध्येच बसली होती. हा अपघात दिल्लीतील शिवालिक रोडवरील मालविया नगरमध्ये झाल्याचे बोललं जात आहे. मात्र अद्याप याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. सध्या या संपूर्ण घटनेची चौकशी सुरु आहे.




दरम्यान या अपघातात अर्शी ही गंभीररित्या जखमी झाली आहे. तिला दिल्लीतील एका रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अर्शीच्या प्रकृतीबद्दल अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. या अपघातानंतर अर्शीचे अनेक चाहते ती लवकरात लवकर बरी व्हावी, यासाठी प्रार्थना करत आहेत.
हेही वाचा : ज्येष्ठ अभिनेत्री माधवी गोगटे यांचे निधन
‘बिग बॉस’ फेम अर्शी खान ही दिल्लीत चित्रीकरणासाठी आली होती. यावेळी तिच्या गाडीचा अपघात झाल्याची माहिती मिळत आहे. सुदैवाने यात ती बचावली आहे. तिच्या कुटुंबियांनी ‘टाईम्स ऑफ इंडिया’ला याबाबतची माहिती दिली आहे.
हेही वाचा : “कंगना उघडपणे हिंसाचाराबद्दल बोलते, मात्र…”; बॉलिवूड अभिनेत्याची संतप्त टीका
अर्शी सोशल मीडियावर नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. लवकरच अर्शी ‘त्राहिमाम’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. अर्शीला खरी लोकप्रियता ही ‘बिग बॉस’मधून मिळाली होती. तसेच तिने ‘विश’ आणि ‘सावित्री देवी कॉलेज अँड हॉस्पिटल’ यासारख्या हिंदी मालिकेत भूमिका साकारली होती