Bigg Boss Marathi 2 : बिचुकलेसोबत असलेल्या मैत्रीविषयी शिवानीचे बाबा म्हणतात…

बिचुकले आणि शिवानी यांच्या ट्युनिंगचे किस्से चांगलेच गाजत आहेत

बिग बॉस मराठीचं पर्व सुरु होऊन ६६ दिवस उलटले आहेत. या ६६ दिवसांमध्ये घरामध्ये अनेक घडामोडी घडल्या. घरातील काही सदस्यांना घरातून बाहेर पडावं लागलं. तर काही सदस्यांची पुन्हा घरात एण्ट्री झाली. त्यातलीच दोन नावं म्हणजे शिवानी सुर्वे आणि अभिजीत बिचुकले. काही कारणास्तव घरातून बाहेर पडलेले हे दोन्ही स्पर्धक घरात परत आले आहेत. त्यामुळे घरातील प्रत्येक कार्याला वेगळं वळण मिळालं आहे. त्यासोबतच त्यांच्या येण्यामुळे घरातील प्रत्येक सदस्याचा उत्साहही तेवढाच वाढला आहे. या दोघांचं घरात चांगलं ट्युनिंग जमत असून त्यांच्या मैत्रीचे किस्से चांगलेच गाजत आहेत. त्यातच शिवानीच्या वडिलांनीदेखील त्यांच्या मैत्रीवर एक भाष्य केलं आहे.

बुधवारी झालेल्या भागामध्ये बिग बॉसच्या घरातील सदस्यांचे कुटुंबीय त्यांना भेटण्यासाठी आले होते.. यावेळी शिवानीच्या बाबांनीही शिवानीची भेट घेतली. या भेटीमध्ये त्यांनी शिवानीसकट घरातील इतर सदस्यांशी गप्पा मारल्या. यावेळी त्यांनी शिवानी आणि अभिजीत बिचुकले यांची मैत्री आवडत असून त्या दोघांचं ट्युनिंग चांगलं असल्याचं म्हटलं आहे.

दरम्यान, अभिजीत घरामध्ये शिवानीला बहिणीप्रमाणे वागवत असल्यामुळे शिवानीच्या बाबांनी त्याचे आभारही मानले. घरामध्ये बाबांना पाहिल्यानंतर शिवानीच्या भावनांचा बांध फुटला आणि ती बाबांजवळ जाऊन मनसोक्तपणे रडली. शिवानीप्रमाणेच घरातील अन्य सदस्यांचे कुटुंबीयदेखील आले होते. किशोरी शहाणे यांचा मुलगा घरात आला होता. तर नेहाचा पती नचिकेतही घरात आला होता.

 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Bigg boss marathi 2 shivani surve abhijit bichukle friendship shivanis father ssj

Next Story
प्रत्यक्षाहुनी उत्कट : सण-उत्सवांची ‘व्हर्च्युअल’ प्रतिमा!
ताज्या बातम्या