बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षीत ‘बिग बॉस मराठी’ सिझन ३ ची दणक्यात सुरवात झाली आहे. जवळपास दोन वर्षांनंतर बिग बॉस मराठी हा शो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. त्यामुळे शोबाबत प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता पाहायला मिळते. यंदाच्या सिझनमध्ये कलाकारांसोबतच सामाजिक कार्यकर्त्या आणि भूमाता ब्रिगेडच्या संस्थापिका तृप्ती देसाई बिग बॉसमध्ये सहभागी झाल्या आहेत. दरम्यान त्यांनी पहिल्याच भागामध्ये इंदुरीकर महाराजांशी संबंधीत वक्तव्य केले आहे.

‘बिग बॉस मराठी ३’मध्ये तृप्ती देसाई, किर्तनकार शिवलीला बाळासाहेब पाटील, मीनल शाह आणि सुरेखा कुडची गप्पा मारत असतात. दरम्यान त्या इंदुरीकर महाराजांविषयी बोलत असल्याचे दिसून आले. शिवलीला म्हणाल्या की, ‘मी म्हणताना असं म्हटलं की या तृप्ती ताई देसाई आहेत. यांनी इंदुरीकर महाराजांच्या विरोधात केस केली होती.” असे म्हणत शिवलीला यांनी मी पुराव्यांच्या आधारेच किर्तन करते असे सांगितले

virendra mandlik criticizes shahu chhatrapati s family
छत्रपती कुटुंबाने राजर्षी शाहू महाराजांच्या नावाला साजेसे काम केले नाही; मंडलिक घराण्याची पुन्हा एकदा टीका
Statue, Shivaji Maharaj, Assam,
आसाममध्ये शिवाजी महाराजांचा पुतळा, चीनच्या सीमेवर २१ पॅरा स्पेशल फोर्समध्ये अनावरण, साताऱ्यातील सुपुत्राचा पुढाकार
Sanyogeetaraje Chhatrapati
कोल्हापूर जिल्ह्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी शाहू महाराज सक्षम उमदेवार – युवराज्ञी संयोगिताराजे छत्रपती
Shahu Maharaj
शाहू महाराज यांच्या विरोधात आक्षेपार्ह संदेश; सतेज पाटील यांची पोलिसांकडे तक्रार

ते ऐकून तृप्ती देसाई म्हणाल्या की, ‘पण त्यांची बरीच किर्तने ही महिलांचा अपमान करणारी होती. आमच्या आंदोलनानंतर इंदुरीकर महाराजांची बरीचशी किर्तने यूट्यूबवरुन डिलिट केली गेली. म्हणजे जवळजवळ ८० टक्के किर्तने डिलिट केली.’ त्यानंतर शिवलीला यांनी ‘बऱ्याच किर्तनकारांनी डिलिट केली आहेत’ असे म्हटले. त्यावर उत्तर देत तृप्ती म्हणाल्या, ‘कारण तेव्हा मी ती मोहिमच चालवली होती. संपूर्ण जिल्हा माझ्या विरोधात उभा होता. मी जाणार म्हटल्यावर १०० किलो मिटर आधी पोलिसांनी मला आधीच ताब्यात घेतले.’

महिलांनी फेटा घालू नये असं इंदुरीकर महाराज म्हणाले होते. “महिलांनी फेटा घातला तर आम्ही काय गाउन घालायच का?” हे त्यांचं वक्तव्य चुकीचं होतं” असं तृप्ती देसाई यावेळी म्हणाल्या. शिवलीला या देखील फेटा घालतात. अनेक कार्यक्रमांमध्ये मला फेटा घातला जातो. त्यात गैर काय असं देखील तृप्ती देसाई म्हणाल्या.