डॅडींचा जावई पुन्हा बिग बॉस गाजवणार? इन्स्टाग्राम पोस्टमुळे चर्चांना उधाण

सध्या त्याची इन्स्टाग्राम पोस्ट ही चर्चेचा विषय ठरत आहेत.

छोट्या पडद्यावरील वादग्रस्त कार्यक्रम म्हणून ‘बिग बॉस’ या कार्यक्रमाकडे पाहिलं जातं. ‘बिग बॉस’ मराठी ३ हा शो सध्या चांगलाच चर्चेत आहे. नुकतंच बिग बॉसमधून वाईल्ड कार्डद्वारे एंट्री केलेली निथा शेट्टी-साळवी घराबाहेर पडली. ती दोन आठवडे बिग बॉसच्या घरात होती. तिच्या एलिमेशनमुळे आता बिग बॉस मराठ्च्या घरात केवळ १० स्पर्धक उरले आहेत. मात्र आता गँगस्टर अरुण गवळी यांचा जावई आणि अभिनेता अक्षय वाघमारे हा पुन्हा बिग बॉसच्या घरात प्रवेश करणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. सध्या त्याची इन्स्टाग्राम पोस्ट ही चर्चेचा विषय ठरत आहेत.

बिग बॉस मराठीचा तिसरा सिझन सुरु आहे. “२ नवीन सदस्य, २ वाईल्ड कार्ड सहभाग, २ आठवड्यात घराबाहेर…” अशा आशयाची एक इन्स्टाग्राम पोस्ट त्याने शेअर केली आहे. यावर त्याने कॅप्शन लिहिताना अक्षय वाघमारे म्हणाला की, “वाईल्ड कार्डद्वारे सहभागी झालेले दोन्ही सदस्य २ आठ्वड्यात घराबाहेर पडले. नवीन वाईल्ड कार्ड एन्ट्रीपेक्षा घराबाहेर पडलेल्यापैंकी काही सदस्यांना पुन्हा संधी मिळाली तर… काय वाटतं तुम्हाला ..??” असा प्रश्न त्याने विचारला आहे.

त्याच्या या इन्स्टाग्राम पोस्टवर नेटकरी कमेंटचा पाऊस पडताना दिसत आहे. अनेकांनी त्याच्या या पोस्टवर आम्हाला तुला पुन्हा बिग बॉसच्या घरात बघायला आवडेल, अशी प्रतिक्रिया दिली आहे. तर काहींनी तू आलास तर आवडेल. पण पारदर्शक खेळ…त्या ग्रुपसाठी खेळू नकोस, अशी कमेंट केली आहे. तुझं मत बरोबर आहे. घरात प्रवेश देतात आणि आऊट…त्यापेक्षा तू ये, अशी कमेंट एका नेटकऱ्याने केली आहे. दरम्यान त्याच्या या इन्स्टाग्राम पोस्टनंतर तो बिग बॉसमध्ये परतणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. मात्र तो पुन्हा बिग बॉसच्या घरात येणार की नाही हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

डॅडींची नात आणि अक्षय वाघमारेच्या लेकीचे गोंडस फोटो पाहिलेत का?

बिग बॉस मराठीचा तिसरा सिझन सध्या चांगलाच चर्चेत आहे. या कार्यक्रमातून अक्षय वाघमारे हा पहिला स्पर्धक बाहेर पडला. तो बाहेर पडल्यामुळे घरातील सदस्यांसोबत त्याच्या चाहत्यांनाही धक्का बसला होता. त्यानंतर बिग बॉसच्या घरात दोन स्पर्धकांनी वाईल्ड कार्डद्वारे एंट्री केली. यात आदिश वैद्य आणि निथा शेट्टी-साळवी यांचा समावेश होता. मात्र हे दोन्ही सदस्य केवळ दोन आठवड्यातच घराबाहेर पडले. त्यानंतर अक्षयने ही पोस्ट शेअर केली आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Bigg boss marathi 3 evicted contestant akshay waghmare to make re enter in house instagram post viral nrp

Next Story
चित्रगीत : सॅक्रेड चॅण्टस ऑफ शक्ती
ताज्या बातम्या