Video : ‘मै तेरी दुश्मन, दुश्मन तू मेरा’; गायत्री आणि मीराचा ‘बिग बॉस’च्या घरात अतरंगी डान्स

हा व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होत आहे.

छोट्या पडद्यावरील ‘बिग बॉस मराठी’ हा शो लोकप्रिय शोपैकी एक आहे. सध्या ‘बिग बॉस मराठी’चे ३ पर्व सुरु आहे. ‘बिग बॉस मराठी’ सुरु झाल्यापासून प्रेक्षकांना सतत स्पर्धकांमध्ये वाद पाहायला मिळाले आहेत. त्यामुळे या आठवड्यात बिग बॉसची चावडीसाठी प्रेक्षक प्रचंड उत्सुक पाहायला मिळत आहे. बिग बॉस मराठीचा पुढचा भाग प्रचंड रंगतदार असल्याचे पाहायला मिळत आहे. यात गायत्री आणि मीरा चक्क नाचताना दिसत आहेत.

कलर्स मराठीने नुकतंच इन्स्टाग्रामवर एक प्रोमो व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत गायत्री आणि मीराकडे एका चाहतीने अतरंगी मागणी केली आहे. या प्रोमोत पुण्यातील एक मुलगी गायत्री आणि मीराकडे अतरंगी मागणी करताना दिसत आहे. गायत्री आणि मीराने ‘मै तेरी दुश्मन, दुश्मन तू मेरा’ या गाण्यावर डान्स करावा, अशी मागणी तिने केली आहे. यानंतर महेश मांजरेकर मंचावरुन यातील नाग कोण आणि सपेरा कोण असा प्रश्न विचारत हसताना दिसतात.

हेही वाचा : “प्रत्येक माणसाला बजावून एकच सांगायचं…लढ”, प्रसाद ओकची पोस्ट व्हायरल

यानंतर व्हिडीओत मीरा आणि गायत्री नाचताना दिसत आहे. यावेळी त्या दोघीही धमाल करताना दिसत आहेत. या दोघीजणी नागाप्रमाणे फणा काढत नाचताना दिसत आहे. कलर्स मराठीने शेअर केलेला हा व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होत आहे.

हा व्हिडीओ शेअर केल्यानंतर त्यावर अनेक नेटकरी कमेंट करताना दिसत आहे. यातील एका नेटकऱ्याने या दोघी कसल्या दुश्मन. या कधी एकत्र येतील काही सांगता येत नाही. पक्के दुश्मन तर जय आणि मीनल आहेत, असे म्हटले आहे. तर दुसऱ्या एका नेटकऱ्याने गायत्रीला थांबवा, नाहीतर दुसरा हात मोडून घेईल, असा सल्ला दिला आहे.

दरम्यान ‘बिग बॉस’ मराठी हा शो फारच लोकप्रिय ठरत आहे. या शोमध्ये दररोज येणारे ट्विस्ट पाहून अनेक चाहते थक्क झाले आहे. बिग बॉस पाहणाऱ्या प्रेक्षक हे विकेंड अर्थातच बी बॉसची चावडी पाहण्यासाठी फारच आतुर असतात. कारण या दोन दिवसात महेश मांजरेकर चांगल्या स्पर्धकांचं कौतुक करतात. तर चुकीच्या पद्धतीने खेळणाऱ्या स्पर्धकांची जबरदस्त शाळा घेतात. त्यामुळे लोकांना शनिवार आणि रविवार बी बॉस मराठीतील चावडी पाहणं फारच औत्सुक्याचं ठरत आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Bigg boss marathi 3 gaytri datar mira jagganath dance on hindi song after fans demand video viral nrp

ताज्या बातम्या