छोट्या पडद्यावरील ‘बिग बॉस’ हा वादग्रस्त आणि तितकाच लोकप्रिय शो आहे. त्यात ‘बिग बॉस मराठी’चे ही लाखो चाहते आहेत. ‘बिग बॉस मराठी’चे हे ३ पर्व सुरु झाले आहे. ‘बिग बॉस मराठी’च्या तिसऱ्या पर्वाला सुरुवात होताच या शोने प्रेक्षकाचं लक्ष वेधून घेतलंय. यावेळी स्पर्धक म्हणून किर्तनकार शिवलीला पाटील यांनी हजेरी लावली आहे. शिवलीला यांनी ‘बिग बॉस मराठी’च्या ३ पर्वात एण्ट्री केल्यापासून त्या सतत चर्चेत आहेत.

‘बिग बॉस मराठी ३’च्या घरात असलेल्या प्रत्येक स्पर्धकाला घरात टिकूण राहण्यासाठी टास्क करावे लागतात. प्रत्येक स्पर्धकाप्रमाणे शिवलीला यांना देखील टास्क करावा लागला. नेहमीच स्टेजवर उभ राहून किर्तन करणाऱ्या शिवलीला यांना टास्क करताना पाहून नेटकऱ्यांनी त्यांना सोशल मीडियावर ट्रोल केले आहे.

two cop suspended over controversy on closing dj
नागपूर: डीजे बंद करण्यावरून वाद, बळाचा वापर करणारे दोन पोलीस निलंबित
Big falls in Sensex and Nifty
सेन्सेक्स अन् निफ्टीत मोठ्या प्रमाणात पडझड; शेअर बाजाराच्या घसरणीला ‘या’ तीन गोष्टी ठरल्या कारणीभूत
newly wedded wife calls her husband aho viral video
बायकोची ‘ती’ हाक ऐकताच लाजली ‘अहों’ची स्वारी! सासरची मंडळीही खुदकन हसली; पाहा Video
Pune Police Arrest Nigerian Woman in Mumbai for Mephedrone Smuggling
मेफेड्रोन तस्करी प्रकरणात पुणे पोलिसांची कामगिरी; मुंबईत नायजेरियन महिलेला अटक

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या पोस्टवर कमेंट करत नेटकऱ्यांनी त्यांना ट्रोल केले आहे. एक नेटकरी म्हणाला, ‘चुकीचा निर्णय घेतला ताई..बिग बॉस हा फालतू अड्डा आहे.’ दुसरा नेटकरी म्हणाला, ‘लोका सांगे ब्रह्म ज्ञान……… स्वतः मात्र कोरडे पाषाण.’ तिसरा नेटकरी म्हणाला, ‘ज्ञानेश्वरीला परवानगी दिली नाही तेव्हाच नकार द्यायला हवा होता..वारकरी संप्रदायाच्या लोकांसाठी ही जागा नाही..हे स्पष्टपणे दर्शवते की आपण प्रसिद्धी निवडतो.’ आणखी एक नेटकरी म्हणाला, ‘ताई चुकीचं आहे हे तुम्ही लोकांना ज्ञान शिकवता आणि तुम्ही जात आहात म्हणजे अवघड आहे.’ दुसरा नेटकरी म्हणाला, ‘लोकांना ब्रम्हज्ञान सांगत होती पण स्वतः मात्र कोरडी पाषाण निघाली वयस्कर बायकांना मालिका बघता म्हणून नाव ठेवत होती आणि स्वतः फालतू शो मध्ये जाते.’ तिसरा नेटकरी म्हणाला,’कलियुगातले किरतन कार घ्या आता’, अशा अनेक कमेंट करत नेटकऱ्यांनी शिवलीला यांना ट्रोल केले आहे.

आणखी वाचा : नागा चैतन्यच्या ‘पहिल्या पत्नी’ विषयी समांथाने केला होता खुलासा

bigg boss marathi 3, shilila patil,
व्हायरल झालेल्या या पोस्टवर कमेंट करत नेटकऱ्यांनी शिवलीला यांना ट्रोल केले आहे.

आणखी वाचा : ‘या’ गोष्टीमुळे समांथा आणि नागा चैतन्यच्या नात्यात पडली फूट?; चर्चांना उधाण

सोलापूर जिल्ह्यातील बार्शी हे शिवलीला पाटील यांचे गाव आहे. सोशल मीडियावर ज्यांची कीर्तने प्रसिद्ध आहेत, अशा तरुण कीर्तनकारांमध्ये ह.भ.प. शिवलीला बाळासाहेब पाटील यांचे नाव घेतले जाते. शिवलीला यांच्या कीर्तनाचे व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात पाहिले जातात. संत साहित्य, संस्कृती आणि सद्य विषयांवर शिवलीला कीर्तन करतात.