बिग बॉस मराठी ३ : मीरा आणि सोनालीमध्ये झाली हाणामारी?

शोचा प्रोमो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

bigg boss marathi 3, meera, sonali,
शोचा प्रोमो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

छोट्या पडद्यावरील ‘बिग बॉस मराठी’ हा शो लोकप्रिय शोपैकी एक आहे. सध्या ‘बिग बॉस मराठी’चे ३ पर्व सुरु आहे. ‘बिग बॉस मराठी’ सुरु झाल्यापासून प्रेक्षकांना सतत स्पर्धकांमध्ये वाद पाहायला मिळाले आहेत. प्रत्येक आठवड्याला एक वेगळा टास्क आपल्याला पाहायला मिळतो. या दरम्यान, स्पर्धक मीरा आणि सोनालीमध्ये हाणामारी झाल्याचे दिसत आहे.

शोचा प्रोमो कलर्स मराठीच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोत आज टास्कमध्ये मीरा आणि सोनालीमध्ये मोठं भांडण झालं आहे. मीरा आणि सोनालीमध्ये हाणामारी का झाली? हे आजच्या भागामध्ये समजेलच पण, मीरा असं देखील म्हणताना दिसणार आहे की, ‘बिग बॉस मला हिच्यापासून धोका आहे.’ त्यावर विकास म्हणाला, ‘सोनाली ती नाटक करते आहे धरून ठेव तिला.’ त्यावर जय चिडून म्हणाला, ‘तू शांत बसं विकास.’ मीरा पुढे बोलते, ‘आईशप्पथ सांगते आहे, बिग बॉस प्लीस थांबवा. नाहीतर ही गेली आज.’

आणखी वाचा : करिश्मा कपूरने सांगितला ‘त्या’ किंसिंग सीन शूट दरम्यानचा किस्सा

आणखी वाचा : आई बंगाली आणि वडील जर्मन मग मुस्लीम आडनाव का लावते दिया मिर्झा?

दरम्यान, या आधी विशाल आणि विकासमध्ये मतभेद झाले तर दुसरीकडे सोनाली आणि विकासमध्ये बाचाबाची झाली. ज्यामध्ये सोनालीने विकासवर आरोप केला की ‘तू माझ्यासाठी खेळला नाहीस. यापुढे ती असे देखील म्हणाली की, ‘मी तुझ्यासाठी नक्की खेळणार.’ काल कॅप्टन्सीच्या उमेदवारीसाठी एकही सदस्य निवडला गेला नाही. कारण, दोन्ही टीममधील मतभेद आणि मारामारी दादूस, सोनाली, गायत्री, विकास सगळे सदस्य कॅप्टन्सीची उमेदवारी मिळवण्यास अयशस्वी ठरले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Bigg boss marathi 3 meera and sonali had a fight during task dcp

Next Story
चित्रगीत : सॅक्रेड चॅण्टस ऑफ शक्ती
ताज्या बातम्या