scorecardresearch

“माझा आजचा अखेरचा दिवस…”, ‘बिग बॉस’च्या घरातून पुन्हा एक्झिट घेताना आदिश वैद्य भावूक

ही पोस्ट शेअर करताना तो भावूक झाल्याचे पाहायला मिळत आहे.

छोट्या पडद्यावरील ‘बिग बॉस मराठी’ हा शो लोकप्रिय शोपैकी एक आहे. सध्या ‘बिग बॉस मराठी’चे ३ पर्व सुरु आहे. ‘बिग बॉस मराठी’ सुरु झाल्यापासून प्रेक्षकांना सतत स्पर्धकांमध्ये वाद पाहायला मिळाले आहेत. बिग बॉस मराठीच्या ग्रँड फिनालेला अवघे काही आठवडे शिल्लक असताना त्यात एक नवा ट्वीस्ट पाहायला मिळाला. यात काही दिवसांपूर्वी बाहेर पडलेल्या तीन सदस्यांना बिग बॉसने काही दिवस घरात राहण्याची परवानगी दिली. यात अभिनेत्री स्नेहा वाघ, आदिश वैद्य आणि तृप्ती देसाई यांचा समावेश आहे.

काही दिवसांपूर्वी बिग बॉसच्या घराच पुन्हा एंट्री घेतलेल्या स्पर्धकांनी नुकतंच एक्झिट घेतली. या एक्झिटनंतर आता अभिनेता आदिश वैद्यने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट शेअर करताना तो भावूक झाल्याचे पाहायला मिळत आहे. या पोस्टसोबत त्याने एक फोटो देखील शेअर केला आहे.

“बिग बॉस मराठी सिजन ३च्या घरातला माझा आजचा अखेरचा दिवस, माझा प्रवास हा इथेच संपत नाही तर पुन्हा एकदा सुरू होतो. आज फक्त आणि फक्त आपल्या प्रेम आणि विश्वासामुळे मी पुन्हा एकदा बिग बॉसच्या घरात आपल्या समोर उभा आहे. माझ्या परीने तुम्हाला पुर्णपणे मनोरंजन करण्याचं प्रयत्न मी केला, टास्क खेळलो. या घराने मला खुप काही दिलयं, आपण खूप काही दिलं, चांगल्या आठवणी घेऊन जातोय आणि खुप खुप धन्यवाद.”

“मला मार्गदर्शन केल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद आणि माझ्या माय बाप प्रेक्षकांना ज्यांच्यामुळे मला इतकं भरगोस प्रेम मिळालं. काही बिघडलेली नाती सुधारली तर काही जवळची नाती अजून जवळ झाली. आता आपला निरोप घेतो. पुन्हा भेटू एका नव्या रूपात. तुम्हा सर्वांना धन्यवाद, असच तुमच प्रेम नेहमी माझ्या पाठिशी असुद्या,” असे त्याने या पोस्टमध्ये लिहिले आहे.

सध्या आदिशची ही पोस्ट फार चर्चेत आहे. नुकतंच बिग बॉसमध्ये एलिमिनेशन राऊंड पार पडला. यंदाच्या आठवड्यात बिग बॉस मराठीतील उत्कर्ष शिंदे, मीरा जगन्नाथ, सोनाली पाटील, गायत्री दातार आणि जय दुधाणे हे स्पर्धक एलिमिनेशन राऊंडसाठी नॉमिनेट झाले होते. यातील उत्कर्ष आणि मीरा हे दोघेही सुरक्षित झाल्याचे पाहायला मिळत आहे. तर सोनाली, गायत्री आणि जय यांच्यातील जय आणि सोनाली हे दोघेही सुरक्षित झाले. त्यामुळे गायत्री दातारने बिग बॉसच्या घरातून एक्झिट घेतली

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Bigg boss marathi 3 serial update adish vaidya share emotional instagram post nrp

ताज्या बातम्या