छोट्या पडद्यावरील ‘बिग बॉस मराठी’ हा वादग्रस्त आणि तितकाच लोकप्रिय शो आहे. ‘बिग बॉस मराठी’चे हे ३ पर्व आहे. या शोमध्ये लोकप्रिय अभिनेत्री स्नेहाने वाघने तिच्या दोन अयशस्वी लग्नांचा उल्लेख केला आहे. स्नेहाचा पहिला पती अविष्कार दारवेकर देखील या शोमध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झाला आहे.

पहिल्या लग्नात तिला शारीरिक आणि मानसिक छळाला सामोरे जावे लागले, असे स्नेहा सांगते. त्यानंतर तिचा पहिल्या पतीसोबत घटस्फोट झाला. तिच्या घटस्फोटा विषयी स्नेहाने ‘बिग बॉस मराठी’च्या घरात असलेली सुरेखा कुडुचीला सांगितले आहे. “एक वेळ अशी होती की, मला घरी जायची भीती वाटायची. शूटवर जाताना मी अर्ध्या शुद्धीत असायची. हे पाहून सेटवरचे लोक मला खूप सांभाळून घायायचे. अनेकदा शूट करतानासुद्धा मला मारहाण झालेल्या खुणा सर्वांना दिसायच्या. आता तो कसाही असला तरी त्याने काही फरक पडत नाही. त्याने केलेल्या गोष्टी मी कधीही विसरू शकत नाही. त्यावेळी मी आई-वडिलांकडे पळून जायचे, घाबरायचे. मात्र, आता मी ती स्नेहा नाही. आता स्नेहा बदलली आहे. ही स्नेहा कोणालाही आणि कशालाही घाबरत नाही. त्यामुळे आता काही झालं तरी मी लढायला समर्थ आहे.”

आणखी वाचा : आर्यनची केस लढणारे सतीश मानेशिंदे एका दिवसासाठी घेतायत इतकी फी…

आणखी वाचा : Bigg Boss 15: ‘ही’ महिला स्पर्धक अंघोळ करत असताना प्रतीकने तोडला दरवाजा अन्…

स्नेहाने वयाच्या १९व्या वर्षी अविष्कार दार्वेकरशी लग्न केले होते. पण त्यांचा संसार फार काळ टिकला नाही. अविष्कार आणि स्नेहाने घटस्फोट घेतला. त्यानंतर २०१५मध्ये स्नेहाने अनुराग सोलंकीशी दुसऱ्यांदा लग्न केले. लग्नाच्या आठ महिन्यांनंतर अनुराग आणि स्नेहानाने वेगळे होण्याचा निर्णय घेतला. अपयशी लग्नाव्यतिरिक्त स्नेहा स्वतःहून ११ वर्षांनी लहान असलेल्या फैसलसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा देखील होत्या. मात्र, त्या दोघांनीही ही अफवा असल्याचे सांगितले.