तृप्तीताई नुसतं सगळं कॅमेरासाठी करतात- गायत्री दातार

टास्क दरम्यान तृप्ती देसाई, गायत्री दातार आणि विकास यांच्यामध्ये भांडण झाले आहे.

Bigg boss marathi 3, Bigg boss marathi 3 update, gayatri datar, trupti desai,

बिग बॉस मराठी सिझन ३च्या घरामध्ये “संयमाची ऐशी तैशी” हे साप्ताहिक कार्य आज रंगणार आहे. या कार्यामध्ये कोणाचा संयम तुटणार? कोण संयमाला धरून चालणार? हे पाहायला मिळणार आहे. दरम्यान, टास्कमध्ये गायत्री आणि विकास तृप्तीताईंना खडेबोल सुनावणार आहेत.
 
टास्कमध्ये गायत्री म्हणाली, “तृप्तीताईंना तर काहीच नाही करता येत नाही. नुसतं सगळं कॅमेरासाठी करायचं आहे.” त्यावर उत्तर देत तृप्तीताई म्हणाल्या, “तुम्ही म्हणाल तसं.” पुढे गायत्री म्हणाली, “आम्ही राक्षस नाही तुम्ही राक्षस आहात खरंतर तर. एक साधा महामेरू बांधता येत नाही, या कसल्या देवदूत? बांधता पण येत नाही नीट हो ना? पण फक्त खोटं बोलतात तृप्तीताई. त्या नाही या टीमकडून नाही त्या टीमकडून बरोबर ना?” टास्कमध्ये गायत्री आणि विकास तृप्तीताईंना ऐकवताना दिसतात.
आणखी वाचा : ‘तुम्हारी कंट्री का कौतुक है’, झिम्मा चित्रपटाचे भन्नाट शिर्षक गीत प्रदर्शित

बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या सिझनमध्ये प्रेक्षकांना आता विकास, तृप्तीताई आणि गायत्री यांच्यामध्ये जोरदार भांडण झाल्याचे पाहायला मिळणार आहे. विकास आणि गायत्रीच्या या बोलण्यावर तृप्तीताई संयम दाखवतील की उत्तर देतील हे पाहायला प्रेक्षक उत्सुक आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Bigg boss marathi 3 update gayatri datar trupti desai avb

Next Story
चित्रगीत : सॅक्रेड चॅण्टस ऑफ शक्ती
ताज्या बातम्या