scorecardresearch

Premium

Big Boss Marathi 3 जिंकल्यानंतर विशाल निकम अडकणार लग्न बंधनात?

‘बिग बॉस मराठी’ सीजन तीनमध्ये नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेत विशालने केलेल्या वक्तव्यावरून त्याच्या लग्नाची चर्चा सुरु झाली आहे.

bigg boss marathi 3, vishal nikam,
'बिग बॉस मराठी' सीजन तीनमध्ये नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेत विशालने केलेल्या वक्तव्यावरून त्याच्या लग्नाची चर्चा सुरु झाली आहे.

छोट्या पडद्यावरील ‘बिग बॉस’ हा सर्वाधिक लोकप्रिय शो पैकी एक समजला जातो. मराठीचे तिसरे पर्व सुरु आहे. नुकताच बिग बॉसचा ग्रॅंड फिनाले झाला. यावेळी आपल्याला बिग बॉस मराठीच्या ३ ऱ्या सीजनचा विजेता भेटला आहे. काही दिवसांपूर्वी बिग बॉसच्या घरात पत्रकार परिषद झाली. यावेळी विशाल निकमने केलेल्या वक्तव्यावरून तो बिग बॉसमधून बाहेर आला की लग्न बंधनात अडकणार अशा चर्चा सुरु झाल्या आहेत.

या एपिसोडमध्ये अनेक पत्रकारांनी पत्रकार परिषदेत हजेरी लावली होती. त्यांनी स्पर्धकांना अनेक प्रश्न विचारले होते. तेव्हाच विशालला त्याच्या सौंदर्याविषयी विचारण्यात आलं होतं. सौंदर्या नक्की आहे का? आणि बिग बॉस मधून बाहेर आल्यावर तिचं खरं नावं काय आहे? असे अनेक प्रश्न विचारण्यात आले होते. त्यावेळी विशाल उत्तर देत म्हणाला की सौंदर्या खऱ्या आयुष्यात आहे आणि बिग बॉसच्या घरात मी तिच्यामुळे राहू शकलो आहे. ती बाहेर असली तरी सुद्धा मला तिच्याकडून शक्ती मिळते. बिग बॉसमधून बाहेर आल्यावर मी नक्कीच तिचं नाव सांगेन आणि सगळ्यांना तिची ओळख करून देईन. त्यासोबत त्याने तिथे उपस्थित असलेल्या पत्रकारांना मस्करी करत त्याच्या लग्नाचे आमंत्रण दिले होते. आता विशाल फक्त बिग बॉसच्या घरातून बाहेर आला नाही तर तो विजेता ही ठरला आहे. आता तरी विशाल लग्न करणार का? किंवा तो सौंदर्या कोण आहे हे तरी सांगणार अशी आशा त्याच्या चाहत्यांना लागली आहे.

pune young girl raped, young girl cheated for 26 lakhs, matrimonial site
तरुणीवर बलात्कार, २६ लाखांची फसवणूक; विवाहनोंदणी संकेतस्थळावरून ओळख
Santacruz murder case
सांताक्रुझ हत्येप्रकरणी आरोपीला अटक, गुन्हे शाखेची कारवाई
theft
जावयाचा सासुरवाडीस हिसका, केले असे की…
Sudhir Mungantiwar praised Soham uikey
आयएएसचे स्वप्न उराशी बाळगणाऱ्या ध्येयवेड्या सोहमचे मुनगंटीवार यांनी केले कौतुक!

आणखी वाचा : ‘गहराइयां’च्या टीझर पेक्षा दीपिकाचा किस आणि बिकिनी चर्चेत!

आणखी वाचा : “घटस्फोटित सेकंड हँड…”, म्हणणाऱ्या ट्रोलरला समांथाचे सडेतोड उत्तर

दरम्यान, बिग बॉस मराठीच्या या सोहळ्याचे सूत्रसंचालक महेश मांजरेकर यांनी यावेळी बिग बॉसच्या यंदाच्या ट्राफी कशी असणार याची झलकही दाखवली. विशेष म्हणजे यानंतर बिग बॉसमधील मिनल शहा, जय दुधाणे, विशाल निकम , विकास पाटील आणि उत्कर्ष शिंदे या टॉप ५ स्पर्धकांचा जबरदस्त डान्सही पाहायला मिळाला.

यादरम्यान मिनल शहा ही बिग बॉसच्या स्पर्धेतून बाहेर पडली. त्यानंतर उत्कर्ष शिंदेंनेही एक्झिट घेतली. त्यामुळे विकास, विशाल आणि जय हे तिघेजण टॉप ३ स्पर्धक ठरले. दरम्यान या तिघांमध्ये सुरुवातीपासूनच चुरशीची स्पर्धा पाहायला मिळाले. यातील विकास पाटील हा स्पर्धेतून बाहेर पडला. यानंतर जय आणि विशाल या दोघांमध्ये विशाल निकम हा बिग बॉसच्या तिसऱ्या पर्वाचा विजेता ठरला. त्याला बिग बॉसची ट्रॉफी आणि २० लाख रुपये बक्षिसाची रक्कम म्हणून देण्यात आली.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Bigg boss marathi 3 winner and actor vishal nikam is really getting married after season ends dcp

First published on: 22-12-2021 at 11:44 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×