महेश मांजरेकर की सिद्धार्थ जाधव? ‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वाच्या होस्टवर अखेर शिक्कामोर्तब

‘कलर्स मराठी’ या वाहिनीने नुकतंच याबाबतचा एक प्रोमो शेअर केला आहे.

महेश मांजरेकर की सिद्धार्थ जाधव? ‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वाच्या होस्टवर अखेर शिक्कामोर्तब
‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वाच्या होस्टवर अखेर शिक्कामोर्तब

छोट्या पडद्यावरील वादग्रस्त कार्यक्रम म्हणून ‘बिग बॉस’ या कार्यक्रमाची ओळख आहे. ‘बिग बॉस मराठी’ हा शो घराघरात लोकप्रिय आहे. बिग बॉसच्या स्पर्धकांमध्ये होणारे राडे, नवनवीन टास्क, मैत्री आणि होणारे वाद यामुळे हा शो कायमच चर्चेत असतो. बिग बॉसचे तीनही पर्व हिट ठरल्यानंतर आता लवकरच चौथे पर्व प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या तिन्ही भागाचे सूत्रसंचालन महेश मांजरेकर यांनी केलं होतं. मात्र चौथ्या पर्वाचे सूत्रसंचालन कोण करणार याबाबत विविध चर्चा रंगल्या होत्या. अखेर याचे उत्तर समोर आलं आहे.

बिग बॉस मराठीच्या तीन पर्वांचे सूत्रसंचालन महेश मांजरेकर यांनी केलं होतं. बिग बॉसच्या निर्मात्यांनी त्यांच्याशी तीन वर्षांसाठी कॉन्ट्रॅक्ट केलं होतं. मात्र गेल्यावर्षी ते कॉन्ट्रॅक्ट संपलं आहे. त्यामुळे आता बिग बॉसचे चौथे पर्व कोण होस्ट करणार असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. त्यानंतर बिग बॉसच्या चौथ्या पर्वासाठी अभिनेता सिद्धार्थ जाधव याचे नाव समोर येत होते. तो हा शो होस्ट करणार असल्याचेही बोललं जात होतं. नुकतंच यंदा बिग बॉसचे पर्व कोण होस्ट करणार याबाबतचा खुलासा झाला आहे. ‘कलर्स मराठी’ या वाहिनीने नुकतंच याबाबतचा एक प्रोमो शेअर केला आहे.
Bigg Boss Marathi 4 : चालतंय की! राणादाचा ‘जीव’ बिग बॉसच्या चौथ्या सीझनमध्ये रंगणार, पहिल्या स्पर्धकाचं नाव जाहीर!

कलर्स मराठीने शेअर केलेल्या या प्रोमोत त्यांनी एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या पोस्टमध्ये एक पाठमोरा अभिनेता टोपी घालून पाहायला मिळत आहे. यावेळी पाठीमागे खेळाडू नवे, घर नव्हे आणि होस्ट.., असा आवाज ऐकायला मिळत आहे.

त्यानंतर होस्ट हा शब्द ऐकताच तो अभिनेता ओरडतो आणि होस्ट मीच असे सांगतो. हा अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसून अभिनेते महेश मांजरेकर आहेत. त्यापुढे ते म्हणतात की “अरे वर्गात विद्यार्थी नवे असतात, पण मास्तर तोच… महेश वामन मांजरेकर, यावर्षी जरा वेगळी शाळा घेऊया.” या व्हिडीओला कलर्सने हटके कॅप्शन दिले आहे. Bigg Boss मराठीच्या नवीन सीझनमध्ये मी घेणार आहे ‘वेगळी’ शाळा!, तर पहायला विसरू नका मराठी बिग बॉसचा नवा कोरा सीझन फक्त कलर्स मराठीवर, असे कॅप्शन त्यांनी दिले आहे.

“…तर मी त्याचं कौतुक करेन ” ‘बिग बॉस’ होस्ट करण्याबद्दल महेश मांजरेकर स्पष्टच बोलले

विशेष म्हणजे महेश मांजरेकर यांनीही हा प्रोमो स्वत:च्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केला आहे. तसेच याआधीचा एक प्रोमोही त्यांनी त्या अकाऊंटवर शेअर केला आहे. त्यामुळे महेश मांजरेकर हेच बिग बॉसचे चौथे पर्वही होस्ट करणार आहे, यावर आता शिक्कामोर्तब झाले आहे. त्यामुळे बिग बॉसच्या चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Bigg boss marathi 4 show host fixed mahesh manjrekar or siddharth jadhav know who is hosting the show nrp

Next Story
सिडनीत ‘चारचौघी’चा देखणा प्रयोग
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी