Bigg Boss Marathi 6 Bhaucha Dhakka : ‘बिग बॉस मराठी’च्या घरात नुकताच दुसऱ्या आठवड्याचा भाऊचा धक्का पार पडला आहे. रितेशने या आठवड्यात कोणाची शाळा घेतली हे जाणून घेण्यासाठी सगळेजण उत्सुक होते. अखेर त्या सदस्यांची नावं आता समोर आलेली आहेत. रितेशने अनुश्री माने, रुचिता जामदार यांना चांगलंच झापलं आहे.

अनुश्रीने प्राजक्ता शुक्रेशी एका टास्कदरम्यान विनाकारण वाद घातला होता, याशिवाय अनुश्री-रुचिताने राकेशवर सुद्धा विचित्र आरोप केले होते. या सगळ्याचा जाब या दोघींना भाऊच्या धक्क्यावर विचारला गेला आहे. रितेश यावेळी खूपच भडकला होता. हे ‘बिग बॉस’चं घर आहे इथे मस्तीत नाही शिस्तीत राहायचं असं त्याने थेट या दोघींनाही सांगितलं आहे.

Live Updates

Bigg Boss Marathi 6 भाऊचा धक्का Updates :

13:37 (IST) 24 Jan 2026

Bigg Boss Marathi 6 : घराबाहेर होणारा पहिला सदस्य कोण आहे? १७ जणांमधून 'ती' झाली एलिमिनेट? चाहत्यांना धक्का

Bigg Boss Marathi 6 First Elimination : नऊपैकी कोणत्या सदस्याचा प्रवास संपणार? सोशल मीडियावर चर्चांना उधाण, नाव आलं समोर... ...सविस्तर बातमी
11:56 (IST) 24 Jan 2026

Bigg Boss Marathi 6 : भाऊंचा Swag भारी.. डायलॉग भारी... सगळंच लयभारी!!!

https://www.instagram.com/p/DT4gzGkCFiG/

11:53 (IST) 24 Jan 2026

Bigg Boss Marathi 6 : भाऊच्या धक्क्यावर सोनालीला सुनावले कडवे बोल

Attitude घरी ठेवायचा, नाहीतर शोमधून बाहेर काढेन…! रितेश देशमुखने सोनालीला थेट सांगितलं, ‘ती’ चूक महागात पडली

( सविस्तर वाचा )

11:07 (IST) 24 Jan 2026

जान्हवी किल्लेकरचं नशीब उजळलं, 'The 50' हिंदी शोचं तिकीट मिळालं! 'हे' २७ स्पर्धक Confirm झळकणार, वाचा संपूर्ण यादी…

Jahnavi Killekar The 50 Show : जान्हवी किल्लेकर हिंदी शोमध्ये एन्ट्री घेणार! २७ स्पर्धकांची नावं आली समोर... ...सविस्तर बातमी
09:33 (IST) 24 Jan 2026

Bigg Boss Marathi 6 : रितेश देशमुखने घेतली 'या' दोन सदस्यांची शाळा

Bigg Boss Marathi 6 : रितेश देशमुखने दुसऱ्या आठवड्यात भाऊच्या धक्क्यावर अनुश्री माने व रुचिता जामदार या दोन स्पर्धकांची शाळा घेतली आहे.

Bigg Boss Marathi 6 : रितेश देशमुखने भाऊच्या धक्क्यावर अनुश्री मानेचा समाचार घेतला आहे. याशिवाय त्याने रुचिता जामदार सुद्धा झापलं आहे.