Bigg Boss Marathi Season 6 Day 10 LIVE Updates : ‘बिग बॉस मराठी’च्या घरात आज राशन मिळवण्यासाठी टास्क पार पडणार आहे. यामध्ये स्पर्धकांना जास्तीत जास्त राशनच्या गोण्या जमा करायच्या आहेत. या टास्कमध्ये विजेत्या टीमला गोल्डन राशन कार्ड मिळेल. तर, उर्वरित सदस्यांना ब्राँझ कार्डावर समाधान मानावं लागेल. याच गोण्यांवरून टास्कमध्ये रोशन भजनकर आणि ओमकार राऊत यांच्यात जोरदार राडा होणार आहे. यावेळी रोशन ओमकारशी वाद सुरू असताना सर्वांना म्हणाला, “मी गोणी सर्वात आधी हातात घेतली…हा पोटापाण्याचा प्रश्न आहे मी खोटं बोलणार नाही.”
आता हा टास्क जिंकून कोणत्या सदस्यांना सुखसुविधा मिळणार हे पाहण्यासाठी सगळेच आतुर आहेत. दरम्यान, सध्या घराची कॅप्टन प्राजक्ता शुक्रे असून या आठवड्यासाठी कॅप्टन्सी उमेदवार म्हणून विशाल कोटियन, आयुष संजीव, रोशन, प्रभू, राकेश बापट या सदस्यांना पॉवर Key मिळाली आहे. याशिवाय घरात अनुश्री व कॅप्टन प्राजक्ता शुक्रे यांच्यातही भांडण होईल. अनुश्री ड्युटी करण्यास नकार देते यामुळे प्राजक्ता प्रचंड चिडते, तसेच त्यांनी मला शिव्या दिल्या असं ती दिपालीला सांगते. यानंतर दिपाली अनुश्रीला शिव्यांबाबत जाब विचारत असल्याचं पाहायला मिळत आहे. यावेळी अनुश्री म्हणते, “काय गं आईला घेऊन आलीस…आता थोड्यावेळाने पप्पांना घेऊन येईल.”
Bigg Boss Marathi 6 Day 10 Updates : 'बिग बॉस मराठी'च्या घरातील दहावा दिवस
Bigg Boss Marathi 6 : घरातील कामं करण्यास अनुश्रीचा नकार
ड्युटीवरुन झाली प्राजक्ता आणि अनुश्रीमध्ये शाब्दिक चकमक!
अनुश्री ड्युटी करण्यास नकार देते यामुळे प्राजक्ता प्रचंड चिडते, तसेच त्यांनी मला शिव्या दिल्या असं ती दिपालीला सांगते. यानंतर दिपाली अनुश्रीला शिव्यांबाबत जाब विचारत असल्याचं पाहायला मिळत आहे. यावेळी अनुश्री म्हणते, "काय गं आईला घेऊन आलीस...आता थोड्यावेळाने पप्पांना घेऊन येईल."
"माझा भाऊ…", अनुश्रीच्या विचित्र आरोपांनंतर राकेश बापटच्या बहिणीची पोस्ट! 'वुमन कार्ड'चा उल्लेख करत म्हणाल्या…
"एक स्त्री म्हणून माफी…", Bigg Boss Marathiच्या आधीच्या पर्वातील अभिनेत्रीची राकेश बापट प्रकरणावर पोस्ट! संताप व्यक्त करत म्हणाली…
Bigg Boss Marathi 6 : राशनच्या गोण्यांसाठी घरातील सदस्यांमध्ये होणार दमदार राडा

बिग बॉस मराठीच्या घरात दहाव्या दिवशी राशन मिळवण्यासाठी टास्क खेळवला जाईल. यादरम्यान रोशन-ओमकार यांच्यात प्रचंड वाद होतील. जाणून घ्या दहाव्या दिवसाचे अपडेट्स
