Bigg Boss Marathi 6 Day 28 Updates : भाऊच्या धक्क्यावर दर रविवारी एलिमिनेशन पार पडतं. या आठवड्यात घरातून बेघर होण्यासाठी एकूण नऊ सदस्य नॉमिनेट होते. यापैकी दिव्या शिंदेचा ‘बिग बॉस’मधील प्रवास संपलेला आहे. कारण, दिव्याने घरातील अन्य सदस्यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्यामुळे शिक्षा म्हणून तिला ‘बिग बॉस’ने निष्कासित केलं आहे. आता उर्वरित रोशन भजनकर, प्रभू शेळके, राकेश बापट, सचिन कुमावत, ओमकार राऊत, अनुश्री माने, आयुष संजीव, दिपाली सय्यद या आठ सदस्यांवर नॉमिनेशनची टांगती तलवार असणार आहे. यांच्यापैकी कोण घराबाहेर होणार जाणून घेऊयात…

Live Updates

Bigg Boss Marathi 6 Updates :

11:57 (IST) 8 Feb 2026

Bigg Boss Marathi 6 : घरातून 'या' सदस्याचा प्रवास संपला? जाणून घ्या....

व्होटिंग ट्रेंडमध्ये दिपाली सय्यद आणि ओमकार राऊत हे दोन सदस्य बॉटम दोनमध्ये होते. यापैकी ओमकार राऊतचा प्रवास घरातून संपला असल्याच्या चर्चा सर्वत्र सुरू झाल्या आहेत. तसेच ओमकारचं एलिमेनेशन झाल्याच्या पोस्ट देखील सोशल मीडियावर सर्वत्र व्हायरल होत आहेत.

दरम्यान, ‘कलर्स वाहिनी’ने यावर अद्याप कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाहीये. रविवारी भाऊच्या धक्क्यावर रितेश देशमुखने एलिमिनेशनचा रिझल्ट जाहीर केल्यावर कोण घरात राहणार आणि कुणाचा प्रवास संपणार हे स्पष्ट होईल.

11:55 (IST) 8 Feb 2026

Bigg Boss Marathi 6 : कोणाची ब्रिफकेस रिकामी असणार? कोण घराच्या बाहेर जाणार?

https://www.instagram.com/p/DUfDsyvIv7u/

Bigg Boss Marathi 6 Day 28 : ‘बिग बॉस मराठी’च्या सहाव्या पर्वातून नुकताच दिव्या शिंदेचा प्रवास संपला. घरातील अन्य सदस्यांना जीवे मारण्याची धमकी दिल्यामुळे तिला ‘बिग बॉस’कडून निष्कासित करण्यात आलं आहे. आता उर्वरित आठ सदस्यांमध्ये कोण एलिमिनेट होणार याची घोषणा रितेश देशमुख भाऊच्या धक्क्यावर करेल.