Bigg Boss Marathi 6 Bhaucha Dhakka Updates : रितेश देशमुख या वीकेंडला सर्वप्रथम दिव्या शिंदेची शाळा घेणार आहे. ती घरात प्रत्येक गोष्टीत राकेश बापटला आपला भाऊ म्हणून सपोर्ट करताना दिसतेय. त्यामुळे दिव्याने ‘लाडका भाऊ योजना’ सुरू केलीये असं रितेश तिला म्हणाला. याशिवाय रितेश घरात होणाऱ्या चोरी प्रकरणावर सुद्धा भाष्य करेल. या आठवड्यात एकूण आठ सदस्य नॉमिनेट आहे.
सोनाली राऊत, दिपाली सय्यद, विशाल कोटियन, प्रभू शेळके, प्राजक्ता शुक्रे, करण सोनावणे, ओमकार राऊत, रुचिता जामदार या आठ जणांवर एव्हिक्शनची टांगती तलवार आहे. सध्याच्या व्होटिंग ट्रेंडनुसार ओमकार राऊत व सोनाली राऊत हे दोन सदस्य बॉटम २ मध्ये आहेत.
Bigg Boss Marathi 6 - भाऊचा धक्का अपडेट्स
Bigg Boss Marathi 6 : रितेश देशमुखने घरातील सगळ्या सदस्यांना झापलं...कॅप्टन्सी कार्यावरून जाब विचारला
Bigg Boss Marathi 6 : रितेश देशमुखने टोचले आयुष संजीवचे कान
उद्धटपणे वागला, नियम मोडले! प्रभू शेळकेचं वय किती? रितेश देशमुखने चांगलंच झापलं, म्हणाला…
Bigg Boss Marathi 6 : एकूण आठ सदस्य नॉमिनेट
सध्याच्या व्होटिंग ट्रेंडनुसार ओमकार राऊत व सोनाली राऊत हे दोन सदस्य बॉटम २ मध्ये आहेत. यांच्यापैकी कोणाचा प्रवास संपणार हे रविवारी ( १ फेब्रुवारी ) रात्री स्पष्ट होईल.
Bigg Boss Marathi 6 : राकेशवरुन भाऊंनी घेतली दिव्याची शाळा...

Bigg Boss Marathi 6 Updates : रितेश देशमुख भाऊच्या धक्क्यावर दिव्या शिंदेला तिच्या गेमबाबत जाब विचारणार आहे. दिव्या आणि ओमकार दोघंही सध्या फ्रंटफूटवर येऊन खेळताना दिसत नाहीयेत.

