Bigg Boss Marathi 6 Day 26 Updates : ‘बिग बॉस मराठी’च्या सहाव्या सीझनचा सध्या चौथा आठवडा सुरू आहे. या आठवड्यात घरातून बेघर होण्यासाठी एकूण नऊ सदस्य नॉमिनेट आहेत. यांच्यापैकी कोणाचा प्रवास संपणार हे रितेश भाऊ येत्या रविवारी जाहीर करतील. पण, त्याआधीच बिग बॉसने या सगळ्या सदस्यांना मोठा धक्का दिला आहे.

‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या आठवड्यात सगळ्याच सदस्यांनी घराचे नियम मोडल्याचं पाहायला मिळत आहे. आता यामुळेच सर्वांना शिक्षा देण्यासाठी बिग बॉसने मोठा निर्णय घेतला आहे. बिग बॉस म्हणाले, “आता एकापेक्षा जास्त सदस्य घराबाहेर जातील. शेवटचे काही तास उरले आहेत.” त्यामुळे डबल एव्हिक्शन होणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. आता घरातील कोणत्या सदस्यांचा प्रवास संपणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Award Banner
Live Updates

Bigg Boss Marathi 6 - २६ व्या दिवसाचे अपडेट्स

10:22 (IST) 6 Feb 2026

Bigg Boss Marathi 6 : दोन सदस्य घराबाहेर जाणार का?

Bigg Boss Marathi 6 : नियम मोडण्याची शिक्षा सदस्यांना मिळणार...नेमकं कोण कोण घराबाहेर जाणार?

https://www.instagram.com/p/DUZuX1OIJzc/

Bigg Boss Marathi 6 : घरातून दोन सदस्य बाहेर जाणार? बिग बॉसने दिला महत्त्वाचा इशारा, सर्वांच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला, घराचे नियम मोडणं महागात पडणार...