Bigg Boss Marathi Day 25 Updates : ‘बिग बॉस मराठी’च्या घरात आजच्या भागात तन्वी व सागर यांच्यात वाद होणार आहे. नुकत्याच प्रसारित झालेल्या भागात प्रेक्षकांना रुचिता जामदार घरात विनाकारण जोरजोरात ओरडत असल्याचं पाहायला मिळालं. यावेळी तन्वीने ‘ही फार नाटकं करतेय’ असं म्हटलं. यानंतर रुचितावरून सागरने तन्वीशी वाद घालण्याचा प्रयत्न केला होता. कारण, गेल्या काही दिवसांपासून सागर कारंडे टोळीमधून गेम खेळताना दिसतोय. रुचिताची सतत बाजू घेताना सागर अनेकदा तन्वीला टोचून बोलत असतो. म्हणूनच “तू मला का बोलतोयस सारखा-सारखा?” असा जाब तन्वी त्याला विचारते असं नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे. पण, “हिची दरवेळची नाटकं आहेत” असं म्हणत सागरने तन्वीचे सगळे आरोप फेटाळले आहेत.

Live Updates

Bigg Boss Marathi 6 - जाणून घ्या २५ व्या दिवसाचे अपडेट्स

12:40 (IST) 5 Feb 2026

आSS…थू! रुचिताने सगळ्या मर्यादा ओलांडल्या; मैत्रिणीशी वाद घातला, अनुश्री माने वैतागली; नेटकरी म्हणाले, "बरं झालं…"

Bigg Boss Marathi 6 : रुचिता व अनुश्रीच्या मैत्रीत फूट! मैत्रिणी वेगळ्या झाल्या, दोघींमध्ये टोकाचा वाद, नेमकं काय घडलं? पाहा प्रोमो ...सविस्तर वाचा
11:17 (IST) 5 Feb 2026

चुकीचा स्पर्श केला! Bigg Bossच्या घरात गोंधळ, रुचितावर मोठा आरोप; राकेश म्हणाला, "आता थेट भाऊच्या धक्क्यावर…"

Bigg Boss Marathi 6 : राकेश बापटने रुचितावर केला मोठा आरोप, घरात गोंधळ! RB हा मुद्दा भाऊच्या धक्क्यावर मांडणार... ...वाचा सविस्तर
09:20 (IST) 5 Feb 2026

Bigg Boss Marathi 6 - नेटकरी सागरवर भडकले

तन्वी व सागर यांच्यात वादात नेटकऱ्यांनी तन्वीला पाठिंबा दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून सागर कारंडे दोन तोंडी बोलत असल्याचं नेटकऱ्यांनी कमेंट्समध्ये म्हटलं आहे.

09:18 (IST) 5 Feb 2026

BB Marathi 6 - तन्वी-सागर वाद

तन्वी - तू मला का बोलतोयस सारखा-सारखा?

सागर- तू मला बोलतेस

तन्वी - तू माझ्याशी अरेरावी करून बोलत आहेस

सागर - मी अरेरावी केलेली नाहीये

तन्वी - तू माझ्यावर राग काढत आहेस...माणुसकीला तरी सागर - वाह रे वाह! आता तुला माणुसकी आठवली

तन्वी - माझ्याशी असं नाही बोलायचं...मला खेळायचं नाहीये.

सागर - हिची दरवेळची नाटकं आहेत यार...

https://www.instagram.com/reel/DUXAlXTjU4X/?igsh=Y25oZzRrbWRhcHhu

09:17 (IST) 5 Feb 2026
Bigg Boss Marathi 6 : तन्वी व सागर कारंडे यांच्यात भांडण

घरात २५ व्या दिवशी तन्वी अन् सागर कारंडे यांच्यात भांडण झालं आहे.

Bigg Boss Marathi 6 : बिग बॉस मराठीच्या घरात सागर अन् तन्वी यांच्यात वाद होणार आहे. पण, नेटकऱ्यांनी यावेळी तन्वीला फुल सपोर्ट केलाय. सागर विनाकारण रुचिताची बाजू घेताना दिसतोय, आधी तो राकेश बापट अन् टीमसह आपला गेम खेळत होता. पण, आता सागर टोळीमध्ये जॉइन झालाय. त्यामुळे काही नेटकऱ्यांनी हा दोन्ही बाजूंनी खेळतोय असंही म्हटलं आहे.