Bigg Boss Marathi 6 Updates : ‘बिग बॉस मराठी ६’च्या घराचा कारभार सहाव्या आठवड्यात राखी सावंतच्या हाती सोपवण्यात आला आहे. आता राखी गेममध्ये कसा तडका देणार? कोणाला खडेबोल सुनावणार आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ती घरातील विविध कामांची विभागणी कशी करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ‘बिग बॉस’च्या घरात सध्या नॉमिनेशन टास्क सुरू आहे. यावेळी विशालने रुचिता आणि त्याच्या नात्याबद्दल भाष्य केलं आहे. गेल्या काही दिवसांपासून विशाल-रुचिता दोघंही तुफान चर्चेत आहेत. रुचिता गेल्या आठवड्यात विशालसाठी अनुश्रीसमोर रडली होती.
दिपालीला नॉमिनेट करताना विशाल सांगतो, “माझ्यात हिंमत आहे मी सगळ्यांसमोर, कॅमेऱ्यासमोर सांगतो मला रुचिता आवडते. मला त्यात काहीच भीती नाही. आता मला ती आवडते…आमचं नातं काय आहे? आमच्यात १५-१६ वर्षांचं अंतर आहे याबद्दल मला कुणालाही उत्तर द्यायचं नाहीये. तो माझा आणि तिचा वैयक्तिक प्रश्न आहे… आम्ही आमचं बघू! आता रुचिता कायम माझं ऐकते तर तुम्हाला काय त्रास आहे?”
याशिवाय नॉमिनेशन टास्कमध्ये प्रभू आणि रोशनमध्ये सुद्धा वाद होणार आहेत. याचा प्रोमो नुकताच समोर आलेला आहे.
Bigg Boss Marathi 6 Updates
Bigg Boss Marathi 6 : घरात कॅप्टन्सी टास्कमध्ये होणार राडा, पाहा प्रोमो
Bigg Boss Marathi 6 : राखी राणीचा भरणार दरबार, कोणाकोणाची हजेरी लागणार?
Bigg Boss Marathi 6 : राखी सावंतच्या हातात घराची सत्ता
Bigg Boss Marathi 6 : वाटीवरून प्रभू आणि विशालमध्ये झाला पंगा!
Bigg Boss Marathi 6 - विशालकडून कबुली!
Bigg Boss Marathi 6 - हो मला रुचिता आवडते! विशालकडून कबुली
प्रभूने रोशनला सुनावले खडेबोल! Bigg Boss Marathi 6 घरातून नॉमिनेट कोण होणार? जाणून घ्या...
प्रभू - तुम्ही विशाल आणि रुचिताची शॅडो होऊन खेळताय...ना तुम्ही कोणाच्या मुद्द्यात बोलता, ना तुमचं मत आहे.
रोशन - मी कमी बोलतो पण योग्य ठिकाणी बोलतो
प्रभू- मी बोललो का तुमच्यामध्ये? मग मला आता बोलूदेत.

नॉमिनेशन टास्कमध्ये छोटा डॉन प्रभू आणि रोशन यांच्यात वाद होणार आहेत. यावेळी प्रभू रोशनला "तुम्ही विशाल आणि रुचिताची शॅडो होऊन खेळताय...ना तुम्ही कोणाच्या मुद्द्यात बोलता, ना तुमचं मत आहे" असं थेट सुनावतो. यानंतर रोशन सुद्धा त्याला प्रत्युत्तर देतो.

